Breaking News

Tag Archives: cm fadnavis

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर सरकार दिशाभूल करत असल्याचा प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी २०१५ मध्ये बिहारच्या निवडणूका डोळयासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तीन वर्षात हालचाल होत नाही…स्मारकाचे डिझाईन फायनल होत नाही…टेंडर काढण्यात येत नाही…वर्क ऑर्डर निघत नाही… ६ डिसेंबर आले म्हणून एखादया अधिकाऱ्याला न्यायचे आणि खोदकाम सुरु करायचं आणि लोकांची दिशाभूल …

Read More »

मानव-वन्यजीवांमधील संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवे धोरण धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी राज्याचे स्वतंत्र धोरण निश्चित करावे, त्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना केली जावी,  असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य वन्यजीव मंडळाची १४ वी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया, आमदार प्रभूदास …

Read More »

भाजप-शिवसेना सरकार हे राज्यावरील सर्वात मोठे विघ्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

कळंब, यवतमाळ: प्रतिनिधी देशातील आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकार हे सर्वात मोठे विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्यासाठीच काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून केंद्रातील व राज्यातील सरकार घालवल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी …

Read More »

६ डिसेंबरपूर्वी दादरचे नामांतर करण्याचे भीम आर्मीचे आवाहन अन्यथा महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी देशातील तमाम आंबेडकर अनुयायांचे श्रध्दास्थान असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ आणि त्यांचे राहते घर दादर परिसरात आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकास डॉ.आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी भीम आर्मीच्यावतीने करण्यात आली असून स्थानकाचे नामांतर ६ डिसेंबरपूर्वी करावे अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशाराही …

Read More »

उद्धव ठाकरे आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्तुतीसुमने

वाशिमः प्रतिनिधी राज्यातील सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडून शिवसेनेला मिन्नतवाऱ्या करण्यात येत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे हे आमचे मार्गदर्शक असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढल्याने भविष्यात भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे. …

Read More »

दिव्यांगावर मात करण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा प्रत्यारोपनाला आर्थिक मदत देणार दिव्यांग व्यक्तींच्या २०१८ धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची मंत्री बडोले यांची माहिती

मुंबई :प्रतिनिधी दिव्यांगत्वावर सुरूवातीच्या काळातच प्रतिबंध करता यावा यासाठी आवश्यक शस्त्रक्रिया अथवा प्रत्यारोपण करता यावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधिल दिव्यांगांच्या ५ टक्के राखीव निधीतून राज्याकडून आर्थिक मदत देण्याची तरतूद या धोरणात करण्यात आली असून हिमोफिलिया आणि थालसिमिया या आजारांवरील उपचाराकरीता प्रत्येक जिल्ह्यात सामान्य रूग्णालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष निर्माण करणार असल्याची …

Read More »

अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्यांकडून भाविकांच्या पैशांवर डल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे बिघडले असून भाजप शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाले आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाकरिता शिर्डी संस्थानला भाविकांनी देणगी दाखल दिलेल्या पैशावर राज्य सरकारने घाला घातला आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हा प्रश्न जनतेने सरकारला …

Read More »

राज्य अल्पसंख्याक आयोग तुमच्या दारी अध्यक्ष हाजी अरफात शेख जाणून घेणार समस्या

मुंबई : प्रतिनिधी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अल्पसंख्याकांच्या विविध समस्या ऐकण्यासाठी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी ‘आयोग आपल्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्याची पहिली सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पासून झाली. यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्हा दौरा करून अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. सोमवार दिनांक …

Read More »

१० स्मार्ट सिटी करणार होतात…एकतरी करायची ना… राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी दहा स्मार्ट सिटी करणार होता ना… मग एक तरी करायची होती ना… करता येत नाहीतर पडता कशाला त्यामध्ये…अशी खोचक टीका करत भाजप सरकारच्या अनेक फसव्या योजना आणि राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यस्था…मेक इन महाराष्ट्रातील गायब उदयोग…आणि रोजगार…यासह अनेक मुद्दयांना हात घालत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप …

Read More »

मुस्लिम-धनगर आरक्षणावरून विरोधक आक्रमक आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणापाठोपाठ राज्यातील धनगर आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे या मागणीवरून विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच या दोन्ही समाजाला आरक्षण देण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणीही केली. यावेळी समाजवादी पार्टीचे अबु आझमी, एमएमआयएमचे इम्तियाज …

Read More »