Breaking News

Tag Archives: cm fadnavis

मुख्यमंत्र्यांना आलेली ती नोटीस फक्त विचारणा करणारी मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी निवडणूकीच्या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वत:बद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. तरीही अँड.सतीश उके यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सदरची याचिका न्यायालयात दाखल करून घ्यायची की नाही याबाबत विचारणा करणारी नोटीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने …

Read More »

स्वत:वरील गुन्हे लपविल्याने मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी निवडणूक प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्हे लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी गमावला आहे. सुप्रीम कोर्टात त्यांची निवडणूक रद्द होईल तेव्हा होईल. परंतु त्यांनी मुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा दयावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना …

Read More »

भाजपा नेत्यांनाच पडला विसर स्व. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा आम्ही फक्त ट्विटरवर अभिवादन वाहणार

मुंबई : प्रतिनिधी भाजपला मराठावाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. परंतु या नेत्याच्या माध्यमातून पक्षाच्या पदावर तर कधी सरकार दरबारी कामे करून घेण्यासाठी फिरणाऱ्या आताच्या भाजप वरिष्ठ नेत्यांना मुंडे यांच्या जयंती दिनीच त्यांचा विसर पडला आहे. केवळ प्रदेश कार्यालयातील …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत अँड. हरीष साळवे न्यायालयात बाजू मांडणार मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री पाटील आणि साळवे यांच्यात तासभर चर्चा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाखाली आरक्षण देण्याविषयीचा कायदा मंजूर करण्यात आल्यानंतर या आऱक्षणाच्या विरोधात काही जणांनी धाव घेतली. त्यामुळे याप्रकरणी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी प्रसिध्द वकील अँड. हरिष साळवे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयातही टिकावा यासाठी यापूर्वीच राज्य सरकारकडून मुंबई …

Read More »

महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून ५ लाख घरांची निर्मिती महामंडळाच्या सहअध्यक्ष पदी सोलापूरचे राजेंद्र मिरगणे यांची निवड

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेखाली राज्यातील सर्वसामान्य नागरीकांसाठी परवडणारी घरे निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून या योजनेखाली २०२२ पर्यंत राज्यात ५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट महामंडळासाठी निश्चित करून दिले असून त्यासाठी लागणारी आवश्यक ती यंत्रणा आणि संसाधने निर्माण करण्याची …

Read More »

यापूर्वी मराठा आरक्षणातंर्गत निवड झालेल्या उमेदवारांनाही पुन्हा संधी परिवहन मंत्री दिवकार रावते यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी यापूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळातील मराठा आरक्षण कायद्यातंर्गत निवड होऊनही केवळ न्यायालयीन स्थगिती मुळे संधी हिरवलेल्या उमेदवारांना यावर्षी पुन्हा संधी उपलब्ध होणार आहे.  त्यावेळी ऊर्जा विभागाने केलेल्या भरती प्रक्रियेत एसईबीसी प्रवर्गातून काही तरूणांची निवड केली. मात्र स्थगितीच्या आदेशामुळे त्या उमेदवारांना संधी मिळावी नव्हती. अखेर त्या उमेदवारांना पुन्हा आता नव्याने …

Read More »

बेरोजगार अंशकालीन पदवीधरांच्या नशीबी अखेर कंत्राटी नोकरीच राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याची कामगार मंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बेरोजगार तरूणांना नोकरी शोधण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधन मिळावे यासाठी अंशकालीन पदवीधरांना तात्पुरत्या स्वरूपात नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु राज्य सरकारकडून कधी तरी केल्याच्या कामाची पावती म्हणून पदवीधरांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात येईल अशी वेडी आशा लागून राहीली होती. मात्र या पदवीधरांना पुन्हा शासकिय संस्थांमध्ये …

Read More »

चार वर्षात भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा कमाविला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप

दर्यापूर : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. चार वर्ष भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याने भाजपचे मंत्री मस्तवाल झाले आहेत. आगामी निवडणुकीत पराभवाची धूळ चारून जनता भाजपच्या नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे सरकारला ५० हजारांचा दंड भारत-पाक युध्दातील जवान असूनही जमिनीच्या प्रतिक्षेत

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शहीद आणि जवानांच्या नावावरून राजकारण करणाऱ्या राज्यातील भाजप सरकारच्या गलथान कारभाराचा फटका एका भारत-पाक युध्दात मर्दमुकी गाजविणाऱ्या सैनिकाला बसला आहे. तसेच या कारभारामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजार रूपयांचा दंड ठोठावून तीन महिन्यात या शुरवीर सैनिकाला जमिन देण्याचे आदेश सरकारला देवून ११ महिने …

Read More »

बाबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर महाराष्ट्रासह देशातील लाखो आंबेडकरी अनुयायांची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी देशातील तमाम मागासवर्गीयांच्या ७० हून अधिक पिढ्यांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत आणि स्वाभिमानाचे अंकुर फुलविणाऱे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटल्याचे चित्र चैत्यभूमी आणि दादर परिसरात पाह्यला मिळाले. काल रात्रीपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनुयांयाबरोबरच देशातील झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि राजस्थान राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर …

Read More »