Breaking News

Tag Archives: cm fadnavis

शिवसेनेला राम पावला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी

मुंबई : प्रतिनिधी मागील चार वर्षे राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले. मात्र आता निवडणूका जवळ आल्याने कदाचित शिवसेनेला खूष करण्यासाठी या उपाध्यक्षपदावर शिवसेनेच्या विजय औटी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे भविष्यात भाजप शिवसेनेची युती होणार असल्याचे हे स्पष्ट संकेत असल्याचे दिसून येत असून शिवसेनेला राम पावला असल्याची मिश्किल …

Read More »

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत लवकरच निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मुस्लिम समाजाचे रद्द केलेले आरक्षण पुन्हा देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावली जाईल. या बैठकीत निर्णय घेवून त्याविषयी राज्य मागासवर्ग आयोगाला विनंती करून त्याचा अहवाल करण्यास सांगण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. गुरुवारी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर …

Read More »

सीमाप्रश्न कोर्टाबरोबरच बाहेरही सोडवावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी बेळगाव सीमाप्रश्नी नियुक्त उच्चाधिकार समितीची बैठक लवकर बोलवावी त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेवून सीमाप्रश्न कोर्टाबरोबरच बाहेरही सोडवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आक्रमक रहावे अशी मागणी विधीमंडळ गटनेते आमदार जयंतराव पाटील यांनी केली. सीमाप्रश्नी नेमण्यात आलेले वकील हरीष साळवे आणि इतर वकीलांशी चर्चा करुन …

Read More »

अखेर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण सत्ताधारी आणि विरोधकांकडून चर्चेविना विधेयक मंजूर

मुंबई : प्रतिनिधी जवळपास एक वर्षाहून अधिक काळ मोर्चे आणि विविध मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारच्या सत्रात विधानसभेत मांडले. विशेष म्हणजे या हे विधेयक कोणत्याही चर्चेविना सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमताने मंजूर करण्यात …

Read More »

मराठा समाजातील ७२ टक्के नागरीकांचे उत्पन्न ५० हजारापेक्षा कमी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधिमंडळात सादर

मुंबई : प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नावरून सातत्याने मोर्चे, धरणे आंदोलन करण्यात येत होते. तसेच राज्याच्या विधिमंडळातही विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे एक आठवड्याहून अधिक दिवस कामकाजही होवू शकले नाही. अखेर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याविषयीचा कृती अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर विधान …

Read More »

संघर्षातून द्राक्षशेती फुलविणारी कृषिकन्या – उमा क्षीरसागर वयाच्या १९ व्या वर्षी ६ एकराचे रान द्राक्षाने शेतीने फुलविले

मराठवाडा म्हटलं की पहिलं चित्र डोळ्यासमोर उभा राहतं ते म्हणजे दुष्काळ आणि दुष्काळी परिस्थितीने नाडलेली इथंली माणसं, परंतु अशा दुष्काळी परिस्थितीत देखील या भागात अशी काही माणसं आहेत जी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर येथील नैसर्गिक परिस्थितीला आव्हान देऊन या भागाची ओळख बदलू पाहत आहेत. खरं तर अशा लोकांकडे पाहून इतरांना …

Read More »

अयोध्यावारीनंतर भाजपकडून शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न चार वर्षानंतर शिवसेनेला विधान परिषदेतील उपसभापती आणि सभेत उपाध्यपदाचे गाजर

मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका नजेरसमोर ठेवत भाजपचा राम मंदीरचा मुद्दा शिवसेनेने हाती घेत भाजपला चांगलीच धोबीपछाड मारली. त्यामुळे यापेक्षा जास्तीची धोबीपछाड परवडण्यासारखी नसल्याने निवडणूकीसाठी एक वर्ष शिल्लक राहीला असताना मागील चार वर्षापासून रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यपद आणि विधान परिषदेतीली उपसभापती पद शिवसेनेला देण्याचे निश्चित करत सेनेला …

Read More »

नाणार आंदोलकांचा विधानसभेवर हल्लाबोल विधान सभेच्या प्रेक्षक गँलरीत घूसून घोषणाबाजी

राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्ताविक नाणार रिफायनरी प्रकल्पासाठीची जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करावी या मागणीसाठी नाणार प्रकल्पविरोधी कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत घुसून जोरदार घोषणा दिल्या. यामुळे विधानभवनातील सुरक्षा रक्षकांची एकच पळापळ सुरु झाली. एकच जिद्द रिफायनरी रद्द, रिफायनरी हटवा,कोकण वाचवा अशा गगनभेदी घोषणानी विधानभवन दणाणून गेले. यावेळी आंदोलकांना सुरक्षा यंत्रणेने …

Read More »

भाजपमध्ये आलेल्या २८ वाल्मिकींमुळे आमदार व त्यांच्या पत्नीचे जीवन धोक्यात भाजप आमदार अनिल गोटे यांचा स्वपक्षांवरच विधानसभेत टीका

मुंबई : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढावी म्हणून गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना पक्षात प्रवेश देण्याची अत्यंत वाईट प्रथा भाजपमध्ये सुरु झाली आहे. तसेच अशा गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना वाल्मिकी बनविण्याचा चंग भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुरु केला असून अशा वाल्यांच्या वाल्मिकींमुळे माझे व माझ्या पत्नीचे जीवन धोक्यात आल्याची गंभीर बाब …

Read More »

कायद्याचा सोयीस्कर अर्थ काढून मुख्यमंत्र्यांकडून सभागृहाची दिशाभूल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल  विधीमंडळासमोर मांडणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. याबाबतीत कायद्याचा सोयीस्कर अर्थ काढून मा. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना वरील त्यांनी आरोप केला. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम (२००५) …

Read More »