Breaking News

Tag Archives: cm fadnavis

आपत्ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे मुख्यमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

मुंबई : प्रतिनिधी पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या राज्यस्तरीय मान्सूनपूर्व तयारीच्या …

Read More »

कर्नाटक निवडणुकीचे निकाल जनतमताची दिशा स्पष्ट करणारे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे मत

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांची पार्श्वभूमी ही वेगळी असून जनता एकाच पद्धतीने विचार करत नाही हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा झाला असताना कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ पैकी फक्त २ जागा विरोधी पक्षांनी जिंकल्या. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये काँग्रेस …

Read More »

मराठा पाठोपाठ आता आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाला स्थगिती सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याच्या निर्णया पाठोपाठ आता आर्थिक दुर्लबांनाही आरक्षणाचा लाभ न देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्यामुळे राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे. मराठा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नव्याने करण्यात आलेल्या आरक्षणाच्या तरतुदी पदव्युत्तर वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना २०१९-२० …

Read More »

जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा टीका

मुंबईः प्रतिनिधी खोटं बोलत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत!अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. मराठा आरक्षणाबरोबरच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने फडणवीस सरकारला चांगलेच फटकारले असून सरकारच्या या कारभारावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त …

Read More »

पालिका रुग्णालयात डॉक्टर भरतीला तात्काळ मंजुरी द्यावी आमदार संदीप नाईक यांची सरकारकडे मागणी

नवी मुंबई: प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेने शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ऐरोली, नेरूळ आणि बेलापूर येथे तीन नवीन रुग्णालये उभारली परंतु ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता असून पालिका प्रशासनाने पाठविलेल्या डॉक्टर भरतीच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री …

Read More »

राज्याच्या ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या पतपुरवठा आराखड्यास मंजुरी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्ष‍ित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पत पुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत …

Read More »

विदर्भ-मराठवाडयातील उद्योगांना २०२४ पर्यंत विद्युत शुल्क माफ उद्योग विकास-रोजगाराला मिळणार चालना

मुंबई: प्रतिनिधी विदर्भ मराठवाड्यातील उद्योजकांना विद्युत शुल्कात माफीची सवलत २०१३ ते २०१९ पर्यंत देण्यात आली होती. ही सवलत पुढील पाच वर्ष म्हणजे २०२४ पर्यंत लागू करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ऊर्जा विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ मराठवाड्यात …

Read More »

राज्यातील मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीड‍िंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी पर‍िस्थ‍िती असून बहुतांशी …

Read More »

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. डॉ. पायल नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तीला राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. ही बाब तिच्याबरोबर शिक्षण घेत …

Read More »

नवी मुंबईच्या सिडको हद्दीतील गावांसाठी अभय योजना पाणीपट्टीच्या थकीत बिलावरील व्याज माफ

मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई परिसरात येणारी सिडको प्रशासित गावे आणि शासकीय नळ जोडणी धारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करुन, मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व ६ महिने कालावधीमध्ये भरण्याची ‘अभय योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली. सिडको क्षेत्रातील गावे आणि शासकीय नळ जोडणी धारक यांच्याकडील थकित …

Read More »