Breaking News

Tag Archives: cm fadnavis

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने आयाराम आणि पक्षांतर्गत आमदारांमध्ये चढाओढ गृहनिर्माण मंत्री, रिक्त कृषीमंत्री पदावर आशा

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या विजयानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे एकाबाजूला भाजपमध्ये येणाऱ्या आयारामांच्या संख्येत वाढ होत असतानाच दुसऱ्याबाजूला भाजपामधील आमदारांच्या मध्ये रस्सीखेच सुरु झाल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. विद्यमान गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांना एम.पी.मिल कंपाऊड प्रकरणी लोकायुक्तांनी दोषी ठरविल्यानंतर त्यांचे मंत्रिपद जाणार असल्याची …

Read More »

कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊन देखील उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाली. शेतीतील गेल्या साडेचार वर्षातील गुंतवणूक आणि जलसंधारणाच्या कामांचे हे यश आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बि-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांना …

Read More »

मुख्यमंत्री म्हणतात, चव्हाणांसह काँग्रेसच्या आमदारांनो भाजपात या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांना भाजपात येण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना रोज सतत फोन करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. इतकंच नाही तर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्नही मुख्यमंत्री आणि भाजपातले इतर नेते करत असून राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही अशोक …

Read More »

बापटांच्या सांसदीय खात्याचा कार्यभार तावडेंकडे पुण्याचे पालक मंत्री पद चंद्रकांत पाटलांकडे

मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट हे लोकसभा निवडणूकीत खासदार झाल्याने त्यांच्याकडील सांसदीय कार्यमंत्री पदाचा कार्यभार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आला. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मांटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे झालेल्या …

Read More »

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये जर्मनीने गुंतवणूक वाढवावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी जर्मन उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिल इंटलिजन्स) यासह सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्येही जर्मनीने गुंतवणूक वाढवावी, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची राज्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिन्डर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची …

Read More »

भाजपाचे सरकार कोणताही भेदभाव न करता जनतेची सेवा करेल प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी भाजपाने लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि कामावर जिंकली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले व त्याचे पक्षाला फळ मिळाले. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेने विश्वास ठेवला. आपण खात्री देतो की, भाजपा आघाडी सरकारचे काम पारदर्शी असेल आणि हे सरकार कोणताही …

Read More »

पालिकेच्या जुन्या इमारती आणि पुर्नविकासाच्या करारनाम्यावर नाममात्र शुल्क राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी शहरातील मुंबई महानगरपालिकेच्या जून्या इमारती व चाळींच्या पुर्नविकासाला गती देण्यासाठी यानिमित्ताने होणाऱ्या त्रिपक्षीय करारावर फक्त १००० हजार रूपयांचे नाममात्र शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेच्या जून्या इमारती आणि चाळींच्या पुर्नविकासाला गती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारती, चाळींचा पुर्नविकास होता सदर ठिकाणची …

Read More »

विखे-पाटलांचा विरोधी पक्षनेता आणि आमदारकीचा राजीनामा भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार

मुंबईः प्रतिनिधी मागील दिवसांपासून काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सतत झडत होत्या. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची आज दुपारी भेट घेत आमदारकी आणि विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत अहमदनगरमधून पुत्र …

Read More »

शासकीय सेवेतील अधिकार्‍याचे कृत्य लांछनास्पद शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईः प्रतिनिधी भारतीय प्रशासन सेवेतील उपायुक्त पदी असलेल्या श्रीमती निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर टाकून लांछनास्पद भूमिका घेतली आहे. हे कृत्य सक्त कारवाईस पात्र असल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी कार्यरत असणाऱ्या निधी चौधरी …

Read More »

१६% आणि १०% आरक्षण हे वेगवेगळे विषय मेजर जनरल सिन्हो यांचा अहवाल महत्वाचा ठरेल

औरंगाबाद: जगदीश कस्तुरे केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गांना दिलेले दहा टक्के आरक्षण यंदा लागू करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील खुल्या प्रवर्गाची प्रवेश प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. राज्यात यंदा याआधी जी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती ती आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गात दहा …

Read More »