Breaking News

Tag Archives: cm fadnavis

रिक्षा-टॅक्सी वाहतूकदारांना १ लाख रकमेचा मोफत विमा कवच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र चिकित्सा,मोफत चष्मा वाटप

मुंबईः प्रतिनिधी सलग ५ वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रणीत नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या वतीने सोमवारी ऑटोरिक्षा व टॅक्सी वाहतूकदारांसाठी संघटनेचे मोफत सदस्यत्व, रुपये १ लाख रकमेचा विमा तसेच मोफत नेत्र चिकित्सा,मोफत चष्मा देण्यात आला. संघटनेचे कुर्ला येथील “उद्धवगड” मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम पार …

Read More »

सेवा निवासस्थाने रिक्त करा अन्यथा फौजदारी कारवाई करू सेवानिवृत्त म्हाडा कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रशासनाची तंबी

मुंबईः प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील तमाम सर्वसामान्य नागरीकांसाठी माफक दरात घरे बांधून उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडा कर्मचाऱ्यांवर बेघर करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे म्हाडा कायद्यातील तरतूदीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना स्वस्त दरात घरे देण्याच्या निर्णयावर म्हाडा प्रशासनाकडून कोणताही निर्णय न देताच सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकाऱ्यांना घरे रिक्त करण्याच्या नोटीसा बजाविण्यात येत असल्याची धक्कादायक बाब …

Read More »

वीरशैव व लिंगायत समाजाचा प्रस्ताव मागासवर्ग आयोगाकडे पाठवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी लिंगायत समाजातील हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत व रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच मंगळवेढा येथील जगद्‌ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आराखडा लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री …

Read More »

सर्व बोर्डांच्या शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक कायद्यात बदल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विविध बोर्डाच्या अर्थात एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं असून तशी कायद्यात योग्य तो बदल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. …

Read More »

एमएमआरडीएच्या हद्दीत आता पालघर ते रायगड पर्यंत वाढ अधिसूचनेच्या ठरावास विधानसभेची मान्यता

मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर, रायगड, वसई, पेण, खालपूर, अलिबागच्या उर्वरीत भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी या सर्व भागांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याविषयीचा अधिसूचना प्रस्तावाचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला असता त्यास भाजप सदस्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुधारणा सुचवित …

Read More »

पुलवामा, बालाकोट हल्ल्यातील शहीदांना आदरांजली पण त्यांचे प्रश्न तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी जनता व्यक्ती म्हणून कुणाच्या हाती सरकार दिले पाहिजे याचा विचार करते. राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना मानवंदना वाहिली. मात्र महाराष्ट्रातील शहीदांचे त्यांच्या कुटुबीयांचे प्रश्न तसेच आहेत. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मात्र आज काही लोक नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहे. हे आपल्या देशाला …

Read More »

अखेर नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात ४० गावांच्या ग्रामस्थांची पसंती

मुंबईः प्रतिनिधी बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन येथील ४० गावातील जमिन अधिग्रहण करण्यासाठी या गावांच्या ग्रामस्थांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात होणारा हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात होणार आहे. याबाबत विधानसभेत लेखी प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

३ लाख कोटींचा अर्थसंकल्प त्यात २० हजार कोटींची तूट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी यंदाच्या २०१९-२० या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडण्यात आला. यावर्षीसाठी ३ लाख ३४ हजार ९३३ कोटी रूपयांचा अंदाजित अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. तर ३ लाख १४ हजार ६४० कोटी १२ लाख रूपयांची अंदाजित महसुली जमा राहणार असून २० हजार २९२ कोटी ९४ लाख रूपयांची राजकोषीय तूट येणार असल्याची …

Read More »

अर्थसंकल्प राज्याचा दृष्टीक्षेपात महत्वाच्या घोषणा

मुंबईः प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणूकीला अवघ्या तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक राहीलेला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला जास्तीत जास्त खुष करण्याच्या अनुषंगाने अर्थसंकल्पातील तरतूदी करण्यात आल्या. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला. गावठाण जमाबंदी प्रकल्पातंर्गत राज्यातील ३९ हजार ७३३ गावांचे जीआयएस मॅपींग …

Read More »

आर्थिक पाहणी अहवाल आहे की दिशाभूल अहवाल? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. मात्र या अहवालात कृषी क्षेत्राचा, उद्योग आणि बांधकाम क्षेत्राचा देण्यात आलेला विकास दर दिशाभूल करणारा असून यानिमित्ताने राज्य सरकारकडून विश्वासर्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचा आरोप करत हा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल आहे की दिशाभूलतेचा अहवाल असल्याचा खोचक सवाल …

Read More »