Breaking News

पुलवामा, बालाकोट हल्ल्यातील शहीदांना आदरांजली पण त्यांचे प्रश्न तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी

जनता व्यक्ती म्हणून कुणाच्या हाती सरकार दिले पाहिजे याचा विचार करते. राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना मानवंदना वाहिली. मात्र महाराष्ट्रातील शहीदांचे त्यांच्या कुटुबीयांचे प्रश्न तसेच आहेत. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मात्र आज काही लोक नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहे. हे आपल्या देशाला शोभणारे नाही. ही विचार कुठे तरी थांबवले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.
आज राज्यात प्रचंड दुष्काळ आहे. चारा छावण्या सुरुच ठेवायला हव्या. हिरवा चारा उपलब्ध होत नाही तोपर्यंत छावण्या सुरू ठेवा.
आज राज्यातील शेतकरी कष्टकरी सामान्य जणांच्या समोर समस्यांचा मोठा डोंगर आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा समस्यांचा डोंगर जनतेसमोर मांडले पण त्यांनाच भाजपने फोडले. विखे पाटलांनी ठग्ज ऑफ महाराष्ट्र म्हणत हिणवलं मात्र तेच विखे आज ठगांमध्ये जाऊन कधी बसले तेच आम्हाला कळले नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

अजित पवारांच्या या वाक्यावर भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेत विखे-पाटील सभागृहात नाहीत. ते सभागृहात असताना त्याबद्दल बोला. त्यामुळे अजित पवार यांचे वक्तव्य पटलावरून काढून टाकावे अशी मागणी केली.
शिवसेनेने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून जयदत्त क्षिरसागर यांना मंत्रिपद दिले. हा सामान्य शिवसैनिकांवर अन्याय आहे त्यांनी किती काळ तुमच्या सतरंज्या उचलायच्या असा सवाल करून ते म्हणाले की, अनेक आमदार खासगीमध्ये नाराजी बोलवून दाखवत आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण ज्यांना मंत्रिपद दिले आहे ते कधीही कुणाचाही हात धरु शकतात हे सरकारने ज्ञानात ठेवा असा इशाराही त्यांनी दिला.
५००० कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप मुख्यमंत्र्यांवर ज्यांनी केला त्यांना मंत्रिमंडळात जागा दिली. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असे ते म्हणाले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण ही देण्यासाठी सांगितले होते त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करायला हवी अशी आमची मागणी आहे.
६ मंत्र्यांना यावेळी वगळण्यात आले त्याचे कारण काय ? याचे कारण सभागृहाला कळायला हवे. या मंत्र्यांनी कामे केली नाही की, भ्रष्टाचार केला, की पक्षाला हवे तसे काम केले नाही त्यामुळे यांना वगळण्यात का ? हे स्पष्ट व्हायला हवे अशी मागणीही त्यांनी केली.
नवनियुक्त १३ मंत्र्यांना फक्त १३ महिने काम करायला मिळणार आहे त्यामुळे चांगले कामे करा जनतेचे तीनतेरा वाजवू नका असा सल्ला देत
मोदी साहेबांच्या नावावर कोणीही निवडून येत आहे काहीही करत आहे. बालभारतीच्या पुस्तकात नवे आकडेवारी सांगितली आहे. हे गांभीर्याने घ्या आपण नवी पिढीचे वाटोळे करत आहोत. राज्याचे कामकाज काही समाधानकारक चालत नाही, बेरोजगारी वाढली आहे, जागा रिक्त असल्याची आठवण करून दिली.

Check Also

सीएए कायद्यांतर्गत ३०० जणांना भारताचे नागरीकत्व बहाल

केंद्र सरकारने १५ मे रोजी नागरिकत्व (सुधारणा) कायदा अर्थात सीएए (CAA) अंतर्गत, २०१९ अंतर्गत अर्ज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *