Breaking News

एमएमआरडीएच्या हद्दीत आता पालघर ते रायगड पर्यंत वाढ अधिसूचनेच्या ठरावास विधानसभेची मान्यता

मुंबईः प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर, रायगड, वसई, पेण, खालपूर, अलिबागच्या उर्वरीत भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी या सर्व भागांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याविषयीचा अधिसूचना प्रस्तावाचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला असता त्यास भाजप सदस्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुधारणा सुचवित मान्यता दिली.

एमएमआरडीएच्या हद्दीत वाढीसंदर्भात यापूर्वीच राज्य सरकारने घेतला होता. मात्र त्यात आणखी वाढ करण्याच्या अनुषंगाने त्याविषयीचा ठराव मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.

या सुधारीत ठरावानुसार मुंबईतील भाग हा आता उक्त प्रदेश ठरविण्यात आला आहे. याशिवाय रायगड जिल्ह्याचा अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, पालघर तालुका, वसई तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील भाग वगळता उर्वरीत भागाचा उक्त प्रदेश अशी विभागणी करण्यात आली असून या भागांचा जलदगतीने, योग्य आणि सुव्यवस्थित विकास करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर शेलू ते कळंबोली तर्फ वरेडी आणि ताकवे, भालीवडी, सावेळए, हेदवली, मांडवणे, भिवपूरी (कँम्प), हुमगांव, साईडोंबर, ढाक, साल्फे, खरवंडी ते चोची गावापर्यंत आणि नंतर खालापूरची पूर्व सीमेच्या भागाचा समावेश करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी काही सुचना केल्या असता ते म्हणाले की,एमएमआरडीएच्या धर्तीवर नागपूर, पुणे, नाशिक ठिकाणी संस्था स्थापन करण्यात आली आहे. तसेच लवकरच औरंगाबादलाही अशी प्राधिकरण स्थापन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *