Breaking News

Tag Archives: cm fadnavis

मतांच्या जोगव्यासाठी यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी दौरा करा मुख्यमंत्री फडणवीस यांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा उपरोधिक सल्ला

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. राज्याच्या बहुतांश भागात खरीपाची पेरणीही झाली नाही. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी भाजप शिवसेनेचे नेते मतांचा जोगवा मागण्यासाठी राज्यव्यापी यात्रा काढून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. या नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी भागाचा दौरा करावा असा उपरोधिक सल्ला देत म्हणजे त्यांना …

Read More »

केंद्र व राज्य सरकारची किमान वेतनवाढ कामगारांची थट्टा करणारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने कामगारांचे किमान वेतन दुप्पट करण्याचा घेतलेला निर्णय फसवा आणि कागदावरचाच आहे. ही वेतनवाढही दिल्ली, त्रिपुरा आणि कर्नाटक राज्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामगार वर्गाला खूश करण्यासाठी केलेली व्यर्थ धडपड असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारचा कार्यकाळ पूर्ण होताना जाता-जाता …

Read More »

निवडणूका आहेत, कामांसाठी ८० टक्के पर्यंतची रक्कम रिलीज करा विकास कामांच्या निधीसाठी विभागांची वित्त विभागाकडे धाव

मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभेचे पडघम वाजण्यास एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहीलेला असताना मतदारसंघातील विकास कामे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी विविध विभागांकडून वित्त विभागाकडे धाव घेण्यात येत आहे. तर वित्त विभागाकडून ८० टक्के पर्यंतचा निधी या विभागांना देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती वित्त विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्याचा …

Read More »

“हौस पुरवा महाराज, मला आणा एक १५ लाखाची गाडी” दोन महिन्यासाठी मंत्रीपद मिळूनही मंत्र्यांचा नव्या गाडीसाठी अट्टाहास

मुंबईः प्रतिनिधी साधारणतः दोन महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होत १३ नव्या चेहऱ्याचा समावेश करण्यात आला. मात्र या सर्वच मंत्र्यांना अवघा दोन महिन्याचा कालावधी मिळणार असताना यातील काही मंत्र्यांनी नव्या चारचाकी वाहनासाठी आपल्याच विभागाकडे हट्ट धरल्याची माहिती नुकतीच पुढे आली. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कँबिनेट मंत्री असलेल्या राजकुमार बडोले, विष्णू सवरा, प्रकाश …

Read More »

स्टील उद्योग उभारणीसाठी रशिया आठशे कोटींची गुंतवणूक करणार स्टिल कंपनीला सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी राज्यात स्टील उद्योग उभारणीसाठी रशियन कंपनीने उत्सुकता दाखविली आहे. तसेच या उद्योगाच्या निमित्ताने पहिल्या टप्प्यात ८०० कोटी तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून या रशियन कंपनीला आवश्यक असणारे सहकार्य राज्य सरकारकडून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. रशियामधील सर्वात मोठी स्टिल कंपनी …

Read More »

मुंबई, कोकणात अतिवृष्टी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाचा इशारा हवामान विभागाचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून सध्या पावसाने उघडीप दिलेली असली तरी पुढील दोन दिवसांत मुंबईसह कोकणात अतिवृष्टी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला. पोषक स्थितीमुळे सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पुढील चार दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस …

Read More »

आणि सतत कोसळणारा मुसळधार पाऊस थांबला पावसाच्या उघडपीने चाकरमान्यांना दिलासा

मुंबईः प्रतिनिधी मध्यरात्रीपासूनच मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सकाळी १०.३० वाजल्यानंतर उघडीप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे घरातून कामावर तरी जावू देतो की नाही म्हणून विचार करणाऱ्या चाकरमान्यांना या उघडपीने चांगलाच दिलासा मिळाला. मध्यरात्रीपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा,विक्रोळी, अंधेरी, हिंदमाता आणि लालबागमध्ये मध्यरात्रीपासून संततधार सुरूच होती. …

Read More »

मुंबईच्या उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रोच्या तिन्ही मार्गास मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग-10 च्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मार्गाची एकूण लांबी 9.209 किमी आहे. यापैकी 8.529 किमी उन्नत तर 0.68 किमी भुयारी मार्ग आहे. …

Read More »

पीक विमा भरण्यास एक महिन्याची मुदतवाढ द्या धानाची रोपे (पऱ्हे) टाकल्यापासूनच पिक विमा लागू करण्याची विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी खरीप हंगामातील पिक विमा भरण्यापासून राज्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत, हे लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा भरण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या समाधानकारक पावसाअभावी अनेक भागात कमी प्रमाणात झालेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भात हा …

Read More »

निवडणूकीच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून ७ वा वेतन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत सरकारी कर्मचाऱ्यांना पाठोपाठ महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायतीतील तब्बल २ लाख कर्मचाऱ्यांनाही ७ वेतन आयोग देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१९ पासून लागू होणार असल्याचे राज्य सरकारच्यावतीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विशेष म्हणजे विधानसभा …

Read More »