Breaking News

शासकीय सेवेतील अधिकार्‍याचे कृत्य लांछनास्पद शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईः प्रतिनिधी
भारतीय प्रशासन सेवेतील उपायुक्त पदी असलेल्या श्रीमती निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर टाकून लांछनास्पद भूमिका घेतली आहे. हे कृत्य सक्त कारवाईस पात्र असल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी कार्यरत असणाऱ्या निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नोटेवरील छायाचित्र काढून टाकावे व जगभरातील त्यांचे पुतळे हटवून त्यांना श्रद्धांजली द्यावी असं धक्कादायक विधान सोशल मिडियावर केल्याचे समजले. महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरणही केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
शासकीय सेवेतील एका जबाबदार वरीष्ठ अधिकार्‍याने अशी लांछनास्पद जाहीर भूमिका घेणे हे निषेधार्ह असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महापुरुषांच्या बाबतीत शासन दरबारी असणार्‍या व्यक्तीकडून असा गंभीर प्रमाद घडावा व त्याकडे राज्य शासनाने कानाडोळा करावा ही दुर्दैवी आणि अशोभनीय बाब असल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली.
राज्याचे प्रमुख म्हणून आपण अशा अधिकार्‍यावर कडक कारवाई करावी जेणेकरुन पुन्हा असा प्रकार घडणार नाही. कारवाई न केल्यास राज्य सरकारची थोर पुरुषांच्याबाबतीतील नीती व नियत अतिशय खालच्या स्तरावर पोहोचली असा समज होईल असा वडीलकीचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

Check Also

सीएए कायद्यांतर्गत ३०० जणांना भारताचे नागरीकत्व बहाल

केंद्र सरकारने १५ मे रोजी नागरिकत्व (सुधारणा) कायदा अर्थात सीएए (CAA) अंतर्गत, २०१९ अंतर्गत अर्ज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *