Breaking News

विखे-पाटलांचा विरोधी पक्षनेता आणि आमदारकीचा राजीनामा भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार

मुंबईः प्रतिनिधी
मागील दिवसांपासून काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सतत झडत होत्या. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची आज दुपारी भेट घेत आमदारकी आणि विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला.
लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत अहमदनगरमधून पुत्र सुजय विखे-पाटील यास काँग्रेसकडून तिकिट मिळावे यासाठी स्वःत राधाकृष्ण विखे-पाटील प्रयत्न करत होते. मात्र पक्षाकडून त्यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास सांगण्यात आल्याने सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत विजय संपादन केला.
त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झाला. तसेच निवडणूकीच्या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी त्यांनी शिवसेना आणि सुजयचा प्रचार केल्याची माहिती उघडकीस आली.
त्यानंतर मुलापाठोपाठ विखे-पाटील ही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. तसेच स्वःत विखे-पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. अखेर नाही, हो म्हणता विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द केला.
काँग्रेसचे आणखी १० आमदार भाजपच्या वाटेवर
विके-पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार यांच्यासह १० आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *