Breaking News

विखे-पाटीलांच्या मंत्री पदाचा निर्णय कोअर कमिटी घेणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यापासून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेशाबाबतच्या चर्चेला उधाण आले होते. त्यानुसार अखेर त्यांनी आज आमदारकी आणि विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर विखे-पाटील यांचा भाजपात प्रवेश लवकरच होईल त्यांना कोणते पालक मंत्रीपद किंवा कोणते मंत्रीपद द्यायचं हे भाजपचे कोर कमिटी निर्णय घेणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
तसेच राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. मात्र तारीख अद्याप निश्चित नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर दुष्काळासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आजच्या बैठकीत आम्हाला त्या त्या विभागाने जे सादरीकरण केले. त्यानुसार जर सर्व गोष्टी पार पडल्या तर महाराष्ट्रात वेळेत पाऊस येईल. आजच्या सादरिकरणामुळे आम्हाला विश्वास आहे की समाधानकारक आणि योग्य पाऊस महाराष्ट्रात येईल
आणि ज्या १५२ तालुक्यात दुष्काळ आहे तो कमी होईल अशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मागच्या मंत्री मंडळ बैठकीत आम्ही कृत्रिम पाऊसासाठी टेंडर काढण्यासाठी अनुमती दिली आहे. आवश्यकता असल्यास कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *