Breaking News

Tag Archives: radhakrushna vikhe patil

शेतकरी उत्पादक संस्था स्थापण्यास व समूह संकलन केंद्र उभारणीस मान्यता

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राबवावयाच्या बाबींमध्ये बदल करण्यात आला असून १० गटांच्या समुहाची शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) स्थापन करावयाच्या तरतुदीसोबतच १० गटांच्या समुहाची शेतकरी उत्पादक संस्था (FPO) स्थापन करण्यास व विपणन सुविधेकरिता समूह संकलन केंद्राची उभारणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागामार्फत निर्गमित …

Read More »

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान

दूध उत्पादकांना प्रती लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येईल. सहकारी दूध संघानी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.२ फॅट / ८.३ एसएनएफ या प्रती करिता किमान २९ रुपये प्रति लिटर इतका …

Read More »

नव्या वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कोणाकडेः मध्यावधी निवडणूकांचे स्पष्ट संकेत

२०१४ मध्ये लोकसभेचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्च आणि एप्रिल महिन्यात निवडणूक तारखांची घोषणा करण्याची तयारी सुरु केली. तसेच काहीही करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे असा चंग भाजपाने आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांधला आहे. परंतु महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही …

Read More »

राजनाथ सिंग यांची टीका, इंडिया म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे…. देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान

भाजपाचे वजनदार मंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे वडील डॉ विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या नावे देण्यात येत असलेल्या साहित्य व कला पुरस्कारांचे वितरण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाषण करताना मुंबईत विरोधाच्या होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका करताना …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे

राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्याचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी …

Read More »

शासकीय व गावठाण जमिनीवरील कातकरी व्यक्तींची अतिक्रमणे नियमानुकूल होणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाण्यातील कातकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असून कातकरी समाजाच्या हितासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात गावठाण जमिनीवरील कातकरी समाजाच्या घरठाणाबाबतची १ हजार ४३३ अतिक्रमणे, शासकीय जमिनीवरील …

Read More »

नारळी पौर्णिमा दिन आता “शेतकरी दिन” पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

यावर्षी ३० ऑगस्ट, २०२३ रोजी म्हणजेच नारळी पोर्णिमा दिनी राज्यात “शेतकरी दिन” साजरा करण्यास येणार आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ २९ ऑगस्ट हा दिवस “शेतकरी दिन” म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. दरवर्षी हा दिवस मराठी तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव …

Read More »

सोलापूर जिल्ह्यातील पात्र चारा छावण्यांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी लवकरच कार्यवाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

सोलापूर जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या. यातील एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीतील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सुधारित प्रस्ताव मुख्य सचिव यांना प्राप्त झाला आहे. अहवाल शासनास सादर झाल्यानंतर पात्र चारा छावणींची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे महसूल …

Read More »

दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी गैव्यवहार प्रकरणी चौकशी महसूल मंत्री विखे पाटील यांचे आश्वासन

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत चौकशी समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीत होत असलेला गैरव्यवहाराबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुनील टिंगरे, राहुल कुल यांनी उपस्थित …

Read More »

गायरान जमीन अतिक्रमणबाबतच्या धोरणास महिन्याभरात अंतिम स्वरूप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आश्वासन

राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबतच्या धोरणाला न्यायालयाच्या निर्देशाला अधीन राहून महिन्याभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ‘लक्षवेधी’द्वारे मांडलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा सार्वत्रिक प्रश्नावर आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत …

Read More »