Breaking News

Tag Archives: radhakrushna vikhe patil

गायरान जमीन अतिक्रमणबाबतच्या धोरणास महिन्याभरात अंतिम स्वरूप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आश्वासन

राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबतच्या धोरणाला न्यायालयाच्या निर्देशाला अधीन राहून महिन्याभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ‘लक्षवेधी’द्वारे मांडलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा सार्वत्रिक प्रश्नावर आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत …

Read More »

पदुम मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आवाहन, पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करा पशुधन जपण्यासाठी शासनाचा प्रयत्न

‘पशुधन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य जपत शेतकरी, पशुपालकांसाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग काम करीत आहे. राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावे, असे पशुखाद्य उत्पादकांना आवाहन करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी …

Read More »

राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश,… जे हजर झाले नाहीत त्यांना नोटीस बजावा सुधारित वाळू / रेती धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी

राज्यात सुधारित वाळू / रेती धोरण तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सुधारित वाळू धोरणासंदर्भात सद्य:स्थितीचा विभागनिहाय आढावा आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहसचिव रमेश चव्हाण, माधव वीर, …

Read More »

राज्यात ८० फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल भागांमध्ये तसेच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे; अशा तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत फिरते पशुवैद्यकीय पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज विधानभवनाच्या प्रांगणात प्रातिनिधिक स्वरुपात पाच फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष …

Read More »

वर्षभरात महसूल विभागाने घेतलेले हे महत्वाचे निर्णय माहित आहेत का? तर जाणून घ्या

सर्वसामान्य जनतेचा राज्य शासनाच्या विविध विभागांशी दैनंदिन संबंध येत असतो. आपल्या विभागातील देण्यात येत असलेल्या योजना, सुविधा यांचा लाभ सर्वसामान्यांना ‍सहज आणि गतिमान पध्दतीने मिळावा, यासाठी माझा प्रयत्न आहे. गेल्या वर्षभरात सर्वसामान्यांसाठी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. वहिवाटीच्या वादावर सलोखा योजना एका शेतकऱ्याच्या ताब्यातील शेतजमीन …

Read More »

मोठी बातमीः सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार दस्त नोंदणी अर्थात दुय्यम निबंधक कार्यालये नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे महसूल मंत्र्यांचे आवाहन

सामान्य जनतेच्या सोयीसाठी जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीत अडचण निर्माण होणार नाही आणि यापुढे नॉनस्टॉप दस्त नोंदणी होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खरेदी -विक्री व्यवहारामध्ये वाढ होत …

Read More »

पदुम मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश, गोवंश प्रजनन नियमावली तयार करा आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मेपर्यंत हरकती मागवा

गाय, म्हैस यांचे दूध वाढण्यासाठी आणि उच्च गुणवत्तेचे प्रजनन योग्य नर तयार करण्यासाठी गोवंश प्रजनन नियमावली राज्य शासन तयार करीत आहे. मात्र पशुपालक, गोपालकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मे २०२३ पर्यंत हरकती मागविण्याची सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी केली. शिवाय …

Read More »

महसूल मंत्री विखे-पाटील म्हणाले, नायब तहसिलदारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा नायब तहसिलदारांना संप मागे घेण्याचे महसूल मंत्र्यांचे आवाहन

राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार (राजपत्रित वर्ग २) यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग -2 यांचे ग्रेड पे …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा, आता थेट घरापर्यंत वाळू, गायरान जमिनीवरील घरांवर कारवाई नाही नगरपालिकांसाठी आता दोन तहसीलदार

राज्यातील बहुचर्चित वाळू लिलाव प्रक्रियेवरून सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच अवैध वाळू उपशामुळे शासनाचे आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या अवैध वाळू उपशाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही अधिकाऱ्यांवर गाड्या घालून जीवे मारण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील वाळू लिलाव प्रक्रिया बंद करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे …

Read More »

१२ वीच्या पेपरफुटीप्रश्नी अजित पवारांचा सवाल, सरकार काय झोपलंय का? शिक्षण मंत्री दिपक केसरकर गैरहजर अखेर महसूल मंत्री विखे-पाटील यांनी संध्याकाळपर्यंत निवेदन करण्याची दिली ग्वाही

नुकतेच १० वीचे पेपर संपून इयत्ता बारावीचे पेपर सुरु आहेत. कॉपीमुक्त राज्याचा संकल्प केला. मात्र त्या संकल्पनेचा पुरता फज्जा उडाला. त्यातच आज १२ वी चा गणिताचा पेपर सुरु होण्यापूर्वीच सकाळीच फुटल्याची घटना उघडकीस आली. याबाबतचे वृत्त पसरताच विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत या विषयी मुद्दा उपस्थित करत म्हणाले, …

Read More »