Breaking News

Tag Archives: radhakrushna vikhe patil

जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ‘मिशन मोड’ वर राबवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसुली कामकाज जलद व पारदर्शी करण्यात यावे. जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या अंमलबजावणींना प्राधान्य देत त्या ‘मिशन मोड’ वर राबवाव्यात. अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल प्रशासनाला दिल्या. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने लोणी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय …

Read More »

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करा पशुसंवर्धन आयुक्त यांचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण  वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ११ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरीता पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी जास्तीत जास्त अर्ज दाखल करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून …

Read More »

पशुसंवर्धनच्या सेवा लोकाभिमुख होण्याकरिता आकृतिबंध सुधारणा आवश्यक

पशुसंवर्धन विभागाच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि त्या सेवा तत्परतेने व पूर्ण कार्यक्षमतेने पुरविण्यासाठी विभागाच्या काही संस्था व कार्यालयांमध्ये संरचनात्मक सुधारणा करणे आणि संस्था, कार्यालयांच्या पदांचा आकृतिबंध सुधारित करणे आवश्यक असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. राज्यातील पशुधनास झालेल्या लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या आकृतिबंधविषयी मंत्रालय …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणतात, मला फिरायचं असतं, वाय प्लस सुरक्षा द्या

तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून सुरक्षा व्यवस्था न पुराव्याचे प्रकरण ताजे असतानाच आता व शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षव्यवस्थेत वाढ करण्यात आली. तर मागील काही दिवसात उध्दव ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांची सुरक्षा कमी करण्याचे प्रमाण वाढत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे पदूम आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपणास ऱाज्यभरात …

Read More »

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपासोबत गेले अन् पावन झालेल्यांची संख्या चार संजय राठोड, राधाकृष्ण विखे-पाटील, विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाले. मात्र न्यायालयीन लढाईमुळे शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार ३९ दिवस रखलेला होता. हा रखडलेला मंत्रिंडळाचा विस्तार आज अखेर झाला. मात्र या विस्तारात भाजपासोबत गेले अन् पावन झालेल्या मंत्र्यांची लक्षात येण्यासारखी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वनमंत्री असलेल्या संजय राठोड यांचे एका …

Read More »

सहकार मंत्रालयाची स्थापना कशासाठी? विचारणाऱ्यांना उत्तर द्यायला आलोय केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचा अप्रत्यक्ष राष्ट्रवादीला टोला

मराठी ई-बातम्या टीम स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी मोदी सरकारने पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन केलं. अनेकांनी विचारलं या मंत्रालयाची कालसुसंगतता काय? असा सवाल विचारणाऱ्यांना   उत्तर द्यायला मी आलोय. देशातील सहकारी साखर कारखान्यांमधून एकूण ३१ टक्के साखरेचं उत्पन्न होतं. हे देशात सर्वांना माहिती नाही. दुधाचं २० टक्के उत्पादन सहकार क्षेत्र करते. १३ टक्के …

Read More »

देशातल्या पहिल्या सहकार परिषदेला काँग्रेसला निमंत्रण पण पवारांना नाही केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांचा आजपासून महाराष्ट्र दौरा

मराठी ई-बातम्या टीम देशातील पहिली सहकार परिषद पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील प्रवरानगर लोणी येथे देशातील पहिली सहकार परिषद होत आहे. या परिषदेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राज्य सहकारी …

Read More »

विधीमंडळाच्‍या लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्‍ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांचा सदस्य म्हणून समावेश

मुंबईः प्रतिनिधी महाराष्‍ट्र विधीमंडळाच्‍या लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गठीत या लोकलेखा समितीच्‍या सदस्‍यपदी माजी मुख्‍यमंत्री आ. पृथ्‍वीराज चव्‍हाण, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी कृषीमंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री अॅड. आ. आशिष …

Read More »

फडणवीस साहेब, आता जातो आम्ही, आम्हाला निरोप द्या भाजपातील आयारामांकडून विरोधी पक्षनेत्याला साकडे

मुंबईः खास प्रतिनिधी राज्यातील सत्तेत आपला वाटा कायमचा रहावा म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक विद्यमान आमदार, नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र आता सत्ता कायमची न राहता महाविकास आघाडीकडे गेल्याने निवडणूकीपूर्वी भाजपात आयाराम झालेल्या नेत्यांना आता पुन्हा मूळ पक्षांचे वेध लागले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आता आम्ही जातो, …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तारात शेलार, विखे, कुटे, सावे, क्षिरसागर, बोंद्रेचा समावेश ? रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात होणार शपथविधी

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या कोट्यातून राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, अतुल सावे आणि डॉ. अनिल बोंद्रे यांचा समावेश होणार आहे. तर शिवसेनेच्या कोट्यातून जयदत्त क्षिरसागर यांचा समावेश होणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. खासदार सुजय विखे-पाटील यांच्या पाठोपाठ त्यांचे वडील …

Read More »