Breaking News

अयोध्यावारीनंतर भाजपकडून शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न चार वर्षानंतर शिवसेनेला विधान परिषदेतील उपसभापती आणि सभेत उपाध्यपदाचे गाजर

मुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका नजेरसमोर ठेवत भाजपचा राम मंदीरचा मुद्दा शिवसेनेने हाती घेत भाजपला चांगलीच धोबीपछाड मारली. त्यामुळे यापेक्षा जास्तीची धोबीपछाड परवडण्यासारखी नसल्याने निवडणूकीसाठी एक वर्ष शिल्लक राहीला असताना मागील चार वर्षापासून रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यपद आणि विधान परिषदेतीली उपसभापती पद शिवसेनेला देण्याचे निश्चित करत सेनेला पुन्हा गळाला लावण्याच्या प्रयत्न भाजपने सुरु केले.

भाजपने शिवसेनेला युतीच्या बेडीत आडकावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूकीची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली असून या पदावर शिवसेनेचे पारनेरचे आमदार विजय औटी यांनी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर विधान परिषद उपसभापतीच्या निवडीचा कार्यक्रम २९ तारखेला सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडून जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधान परिषदेतील उपसभापतीचे पद शिवसेनेला देण्याची शक्यता सत्ताधारी भाजप गोटातून वर्तवली जात आहे. तरीही सत्ताधारी भाजप व सेना यांचे आणि विरोधी बाकावरील काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सदस्य बळ सारखे असल्याने अपक्षांना आणि भाजपच्या सहयोगी सदस्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

मागील चार वर्षांपासून केद्रांत आणि राज्यात भाजप सोबत शिवसेना सरकारमध्ये सहभागी  आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सत्तेत राहून टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तरीही अलिकडेच शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांची महामंडळावर वर्णी लावून घेतली. तर राम मंदिराच्या मुद्यावर भाजपने कायदा केला तर शिवसेना सोबत असेल अशा आशयाचे वक्तव्य केल्यामुळे शिवसेना यामुद्यावरून भाजपला अडचणीत आणण्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे विधान परिषद आणि विधानसभेतील रिक्त असलेल्या जागा शिवसेनेला देवून त्यांना गोंजारण्याचे भाजपचे धोरण आहे.

विधानसभा उपाध्यक्ष पदाचा कार्यक्रम जाहीर झाला असून उद्या(ता.२९) ११ पर्यत अर्ज भरण्याचा कालवधी आहे.विधानसभेत भाजपचे संख्याबळ १२३ आणी शिवसेना ६३ असे संख्याबळ आहे. सेनेतर्फे विजय औटी यांचे नाव आघाडीवर असले तरीही संजय शिरसाठ, सुभाष साबणे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. विरोधकांनी उमेदवार दिला तर निवडणूक परवा(ता.३०)  होऊ शकते. मात्र ही शक्यता धुसर आहे.

उपसभापती पदी नीलम गोऱ्हे?

उपसभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम उद्या घोषित होण्याची शक्यता असून या पदावर शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांची निवड होण्याची शक्यता आहे. तरीही या पदासाठी गोऱ्हे यांच्यासह सेनेचे गोपीकिसन बजोरीया हे देखील अर्ज दाखल करू शकतील. श्रीकांत देशापांडे अपक्ष म्हणून अर्ज दाखल करू शकतील. त्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता असली तर या दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याकडे सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न राहणार आहे. सध्या विधान परिषदेत भाजप २२, शिवसेना १२, काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस १७, शेकप १, लोकभारती १, असे बलाबल आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *