Breaking News

Tag Archives: cm fadnavis

मी बयान बहादूर नाही… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेनंतर उध्दव ठाकरे यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदीर उभारणीच्या अनुषंगाने कथित वक्तव्यांचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा थेट नामोल्लेख न करता बयान बहादूर आणि बडबोले अशी उपरोधिक टीका केली. या टीकेची दखल घेत उध्दव ठाकरे यांनी तातडीने मी हिंदू समाजाच्या भावना समोर ठेवल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न …

Read More »

यांचे निर्णय… यांची धोरणं चुकल्याने राज्य संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सरकारवर टीका

जालना: प्रतिनिधी आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे निर्णय आणि धोरणं चुकली आहेत त्यामुळे संपूर्ण राज्याला त्याचा फटका बसत आहे. राज्य मोठ्या संकटात आहे असं असताना यांना झोप तरी कशी लागते असा सवाल करतानाच यांना खरा आदेश देवून टाका असे जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जालना …

Read More »

छ.शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून ५० टक्के शेतकरी वंचित एकवेळ समझोता योजना म्हणजे धुळफेक असल्याचा काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा भाजप शिवसेना सरकारचा दावा पूर्णपणे खोटा ठरला असून या कर्जमाफीतून ५० टक्के शेतकरी वंचित राहिल्याने शेतक-यांना न्याय देण्यात ही योजना पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. छत्रपती …

Read More »

पंतप्रधान मोदीमध्ये मंदीची आकडेवारी जाहीर करण्याची ताकद नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

नांदेडः प्रतिनिधी देशात मोठी मंदी आल्याचे सांगितलं जातंय. ही मंदी कायम राहिली तर देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. इतके कारखाने आलेत पण किती आले ते सोडून किती कारखाने बंद झाले याचे आकडे मोदीनी द्यावे. पण हे आकडे द्यायची त्यांची ताकद नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान …

Read More »

आश्चर्य, पवारांसारखा ज्येष्ठ नेताही शेजारच्या देशाबद्दल चांगल बोलतात पाकिस्तानच्या स्तुस्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पवारांवर टीका

नाशिकः प्रतिनिधी निवडणूकांमध्ये मते मिळावीत यासाठी शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेतेही शेजारच्या देशाबद्दल चांगले बोलत आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्र, भारत देश आणि जगाला माहित आहे की, दहशतवादाचे अड्डे आणि शस्त्रास्त्रे कुठून येतात. त्यामुळे पवारांच्या वक्तव्याबाबत आश्चर्य वाटत असल्याची उपरोधिक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या टप्प्यातील …

Read More »

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी खाजगीकरणाच्या विरोधात करणार आंदोलन सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, आझाद मैदानावर आंदोलन करणार

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या सर्व विभागातील २५ टक्के पदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने आगामी २-३ वर्षात सरकारी सेवेतील चतुर्थश्रेणीची पदेच नष्ट होणार आहेत. त्यातच शिपाई प्रवर्गासाठी खाजगी संस्थेकडून मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत असल्याने राज्य सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि मुंबईत आझाद मैदानावर १९ …

Read More »

पालघर, मेळघाटमधील बाईक ऍम्ब्युलन्स सेवा बंद पडल्याचा सरकारलाच पत्ता नाही भाजप-शिवसेना सरकारची जाहीरातबाजीमध्येही 'बनवाबनवी'! -विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात फसवण्याचा उद्योग करुन जनतेची दिशाभूल केली असून आता जाहिरातबाजीतही त्यांनी खोटारडेपणाची सीमा ओलांडली आहे. आरोग्य विभागाच्या जाहीरातीत दिलेली माहिती सपशेल खोटी आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारची पाच वर्षातील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची झाली असून कोणताही घटक …

Read More »

मला अजून लय जणांना घरी पाठवायचय ! राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकिय कुरघोडीचे संकेत

सोलापूर-मुंबईः प्रतिनिधी राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न दाखवित राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेसमधील अनेक आमदार, नेत्यांना भाजपाने गळाला लावत विरोधकांना निष्भ्रम करण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र मी काय म्हातारा झालो? अजून लय जणांना घरी पाठवायचय असे सांगत राजकिय कुरघोडीत आपणही मागे नसल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणूकीत तोडीसतोड उत्तर देणार असल्याचे स्पष्ट संकेत …

Read More »

नियोजनशून्य कारभारामुळे पाच वर्षात ६० टक्केच निधी खर्च भाजप-शिवसेना सरकारचा आर्थिक नियोजनात बेशिस्तीचा कळस: विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी भाजप शिवसेना युती सरकारची पाच वर्षातील कामगिरी सुमार झाली असून आर्थिक नियोजनही फसले आहे. सरकारचा आर्थिक ताळेबंद पाहिला तर पाच वर्षात सर्व विभागांसाठी एकूण १४ लाख १३ हजार २७६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती, परंतु ८ लाख ९६ हजार ४८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याचाच …

Read More »

आम्ही विदर्भाला पैसे दिलेच पण पश्चिम महाराष्ट्रालाही पूर्ण निधी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर

सांगली-पलूसः प्रतिनिधी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना पश्चिम महाराष्ट्रात डझनभर मंत्री होते. विदर्भाचा अनुशेष म्हणून तिकडे पैसे द्यावे लागतात असे सांगून ते पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांना निधी देत नव्हते. आम्ही सत्तेवर आल्यावर विदर्भाला तर निधी दिलाच पण पश्चिम महाराष्ट्रातील टेंभू- ताकारी – म्हैसाळ अशा सर्व योजनांसाठी पूर्ण निधी …

Read More »