Breaking News

पंतप्रधान मोदींनी सांगितले गणेश विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण रोखा मीठी नदी प्लास्टीक मुक्त करण्याचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी
जर मी तुम्हाला एखादा संकल्प करायला सांगितला तर तुम्ही करणार का? ” अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी जमलेल्या समुदायाला केली. त्यावेळी सगळ्यांनी हो असे उत्तर देताच मोदी म्हणाले, यावर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी प्लास्टिक आणि जलप्रदूषण वाढणवारी सामुग्री समुद्रात जाणार नाही याची काळझी घ्या
दिवसेंदिवस जलप्रदुषणात वाढ होत आहे. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण रोखण्याचे आवाहन सर्व गणेश भक्तांना त्यांनी केली.
मुंबईत मेट्रोच्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या भूमिपूजन समारंभाला राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“बाप्पाला निरोप देताना खूप सारं प्लास्टिक आणि इतर कचरा समुद्रात फेकला जातो. यावेळी हा प्रयत्न करुया की असं कोणतंही सामान समुद्रात जाणार नाही ज्यामुळे जल प्रदूषण वाढीस लागेल. जलप्रदूषण वाढू शकतं अशी कोणतीही सामुग्री पाण्यात जाऊ नये याची काळजी घ्या” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर मीठी नदी प्लास्टीकमुक्त करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या भाषणाच्या वेळी त्यांनी सगळ्याच उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचंही कौतुक केलं. कायम मोठमोठी आव्हानं इस्रोचे वैज्ञानिक समर्थपणे पेलत असतात. जोपर्यंत ते आपलं लक्ष्य पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत ते थांबत नाहीत त्यांचं काम अविरतपणे सुरु असतं. त्यांचा हा गुण मला खूप चांगला वाटतो असे कौतुकोद्गार त्यांनी यावेळी काढले.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *