Breaking News

Tag Archives: bjp

मणिपूरप्रश्नी अमित शाहंचे बोलणे इंडियाने केले अमान्य, पंतप्रधान मोदीनींच बोलावं अखेर लोकसभेबाहेर विरोधक आणि सत्ताधारी भाजपाच्या खासदारांची परस्पर विरोधी निदर्शने

७० दिवसाहून अधिक काळ झाला एकाबाजूला मणिपूर राज्यात सुरु झालेल्या हिंसाचारामुळे ईशान्य भारतातील एकसंधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या हिंसाचाराच्या काळात आपले चार ते पाच देशांचे परदेश दौरेही करून आले. मात्र सविस्तर निवेदन केले नाही. अखेर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी संसदेत मणिपूर …

Read More »

हसन मुश्रीफ महायुतीत; कोल्हापूरात सतेज बंटी पाटील यांची स्पष्टोक्ती, हे शक्य नाही मुश्रीफ-पाटील यांच्या दोस्तीला ब्रेक

कोल्हापूरच्या राजकारणात भाजपाला काही केल्या टिकू द्यायचे नाही असा चंग बांधलेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज बंटी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहे. यापूर्वी भाजपाच्या महादेव महाडीक यांच्या बालेकिल्ल्याला हादरे देण्याचे कामही या जोडगोळीने केले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले हसन …

Read More »

मणिपूरमधील भाजपा आमदाराकडूनच पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह न्युजलाँड्री या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट

साधारणतः दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूर मधील हिंचासार काही केल्या शांत होण्याची चिन्हे दिसून येत आहे. अखेर मणिपूरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दट्ट्या दिल्यांनंतर व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा शासित मणिपूरबरोबर काँग्रेसची राजवट असलेल्या राज्यांना लक्ष्य करत विरोधकांवरच टीका केली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून भाजपाने केला साजरा राज्यात ठिकठिकाणी भाजपाचे सेवा कार्य

रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर, कृत्रिम अवयवांचे वाटप, पूरग्रस्त कुटुंबांना धान्य वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नागपूर येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, …

Read More »

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पोस्टर्स लावले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही…१४५ आमदार… मिटकरी यांच्या ट्विटवरून हसन मुश्रीफ यांची सावध प्रतिक्रिया

राज्याचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर अजित उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने यापूर्वी जाहिर केले होते. मात्र इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून दुर्घटना घडली असून त्यात आता पर्यंत २२ लोकांचा मृत्यू तर १०५ नागरिक अद्यापही बेपत्ता …

Read More »

अजित पर्व आणि मणिपूर हिंचाचारावर संजय राऊत म्हणाले, कोणीही ट्विट करण्याची गरज नाही…. एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज वाढदिवस आहेत. या वाढदिवसानिमित्त नागपूरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. कारण यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या शपथविधीचा २०१९ सालचा फोटो असून त्यावर लिहिलेली वाक्ये लोकांचं लक्ष वेधून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे कुटुंबियासोबत पंतप्रधान मोदी यांना भेटले, “पण आज आई असायला हवी होती…” इर्शाळगड ते धारावी सर्व विषयांवर चर्चा झाल्याची माहिती

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीसा पाठवित सात दिवसात लेखी म्हणणे मांडण्याची मुदत दिली. त्याचबरोबर राज्यातील भाजपाप्रणित सरकार कायम टीकविण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट फोडत सरकारमध्ये सहभागी करून घेतला. त्यामुळे राज्यात नेतृत्वबदल लवकरच होणार अशी चर्चा सुरु असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन, मुंबईतील एसआरए प्रकल्पातील अडचणीसंदर्भात दोन आठवड्यात बैठक झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार

झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकांने विकली तर नव्याने झोपडे घेणाऱ्या मालकांचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ट करण्याबाबत मुंबईतील बहुसंख्य एसआरए योजनांमध्ये निर्माण झालेला मोठा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झालेल्या प्रश्नांवर बोलताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत उच्चस्तरिय बैठक दोन आठवड्यात घेण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. विधानसभेत …

Read More »

मंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन, अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही शाळांवर कारवाई कऱण्याची प्रक्रिया सुरु

राज्यात शिक्षण विभागामार्फत विविध शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे ६६१ शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई …

Read More »

अशोक चव्हाण यांचा सवाल, अहमदाबादसाठी १८ विमाने; राज्यांतर्गत फक्त १५ का? महाराष्ट्रातील विमानसेवांवर अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रोज १८ विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी सर्व मिळून जेमतेम १५ विमानसेवा का? असा सवाल काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. राज्यातील विमानतळांची दूरवस्था आणि विमानसेवेबाबत त्यांनी आज विधानसभेत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी लक्षवेधी मांडली. या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध विमानतळांचे प्रश्न …

Read More »