Breaking News

अजित पर्व आणि मणिपूर हिंचाचारावर संजय राऊत म्हणाले, कोणीही ट्विट करण्याची गरज नाही…. एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज वाढदिवस आहेत. या वाढदिवसानिमित्त नागपूरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. कारण यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या शपथविधीचा २०१९ सालचा फोटो असून त्यावर लिहिलेली वाक्ये लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनर्सवर ही दोस्ती तुटायची नाय, अजितदादा हे राजकारणातले दादा आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले चाणक्य आहेत अशी वाक्ये लिहिली आहेत.

तत्पूर्वी, अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि त्यांच्या गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्वीटने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व…, अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि राज्यात अजितपर्व सुरू होईल, असा दावा अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटमधून केल्याचं पाहायला मिळत आहे.

या ट्विट आणि नागपुरातली बॅनरबाजी यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, कोणी काही ट्वीट करायची गरज नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनायला गेले तेव्हाच मी सांगितलं होतं की, अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होतील. हे सांगणारा मी पहिला माणूस होतो. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल, हे मी आधीच सांगितलं आहे.

तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील बॅनर्सवर प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे मिळून एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करतील.

संजय राऊत म्हणाले, ही दोस्ती आहे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे जवळचे संबंध आहेत, हे दोघे मिळून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा अगदी मस्त कार्यक्रम करतील. हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलोय. सगळं काही ठरलेल्या स्क्रिप्टप्रमाणे होईल.
तर मणिपूरमधील व्हायरल व्हिडिओ आणि हिंसाचारावरून संजय राऊत यांनी मणिपूर घटनेवरून थेट केंद्र सरकारवर आरोप केला.

खासदार संजय राऊत म्हणाले, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे, भारतीय सैन्यावरही हल्ले होत आहेत. परंतु तिथलं सरकार मूकदर्शक बनून फक्त तमाशा बघत आहे. तिथली परिस्थिती काश्मीरपेक्षा भयंकर आहे. परंतु भाजपा तिथे लक्ष घालत नाही. कारण तिथे हिंदू-मुस्लिम राजकारण करता येत नाही. मणिपूरमधील हिंसाचार आणि तिथल्या घटनांचा भाजपाला राजकीय फायदा होत नाही. म्हणून याप्रकरणी भाजपावाले शांत आहेत अशी खोचक टीकाही केली.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, या घटनेत तिथे एखादा दुसऱ्या समुदायाचा, अल्पसंख्याक समाजाचा किंवा मुसलमान असता तर यांनी भाजपाने आतापर्यंत देशात गोंधळ घातला असता. आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे की, या प्रकरणावर मोदीजी इतके दिवस काही बोलले नाहीत, केंद्र सरकार काही भूमिका घेत नाही, तिथले राज्यपाल काही बोलत नाहीत. यावर आपल्या राष्ट्रपतीसुद्धा काहीच बोलत नाहीत अशी टीकाही केली.

खासदार राऊत म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य खूप महत्त्वाचं आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या देशातील महिला सरकार बदलतील. आम्हालाही तसंच वाटतंय. मणिपूरमधील अत्याचाराच्या घटनेनंतर देशातल्या महिलांमध्ये खूप संताप आहे. त्यांना या घटनेचं खूप दुःख झालं आहे. मणिपूरची घटना असो, अथवा इतर ठिकाणी घडलेल्या घटना असतील, त्याबाबत सरकारविरोधात संताप आहे. त्यामुळे देशातल्या महिलांनी हे सरकार बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचं वक्तव्यही केलं.

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *