Breaking News

भेटीनंतर उद्धव ठाकरे यांची खंत, ….त्यांच्यासमोर जाताना लाज वाटत होती पक्षाचं सरकार म्हणून नव्हे तर जनतेचं सरकार म्हणून पाहतोय

खालापूरमधील इरर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडी येथे बुधवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून १०५ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. अशातच आज २२ जुलै रोजी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधत धीर दिला. पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असं आश्वासन देत ते म्हणाले, आज त्यांच्यासमोर जाताना मला लाज वाटत होती असे वक्तव्य केलं.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज इर्शाळवाडीचा दौरा केला. आपल्या दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अशा घटना घडू नयेत.. किंवा अशा आपत्ती आल्या तर त्याला एकत्रितपणे तोंड देण्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. तसंच आज मी सरकारकडे पक्ष म्हणून नाही तर जनतेचं सरकार म्हणून पाहतो आहे कारण लोकांना मदतीची अपेक्षा आहे. इर्शाळवाडीतले जे लोक वाचले आहेत त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आणि भविष्यात डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांबाबत अशी घटना घडू नये म्हणून ठोस पावलं उचलण्याची गरज आहे अस उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त करत म्हणाले, त्यांच्यासमोर गेल्यावर मी काय देऊ शकतो फक्त कोरडे शब्द त्यामुळे त्यांच्यासमोर जाताना मला लाज वाटत होती असंही म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज त्यांच्यासमोर जाताना मला लाज वाटत होती. मी यांना काय देऊ शकतो? तुमच्या दुःखात सहभागी आहे हे कोरडे शब्द देऊन काय होणार आहे? हा कोरडेपणा लाजीरवाणा झालेला आहे. दरवर्षी अशा घटना घडणं लाजिरवाणी गोष्ट आहे. मला आठवतं आहे मी मुख्यमंत्री असताना दोन चक्रीवादळं आली होती. निसर्ग आणि तौक्ते.. तेव्हा किनारपट्टीचा धोका लक्षात घेऊन भूमिगत वीज योजना योजली होती. लोकांना चांगले निवारे तयार करण्याची योजना आखली होती. तसं आता यावर या सगळ्या वस्त्यांवर उपाय योजना केली पाहिजे. आपल्याकडे प्रशासन आहे, कलेक्टर, तलाठी, तहसीलदार सगळे आहेत. त्यांना बसवून मांडणी केली तर आपण ही संकटं टाळू शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली.

त्याचबरोबर पुढे बोलताना उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, डोंगर उतारांवर ज्या वस्त्या घरं आहेत तिथे कधीही दरडी कोसळू शकतात. आमचं सरकार असताना तळियेची दुर्घटना घडली होती. होत्याचं नव्हतं झालेलं मी त्यावेळी पाहिलं आहे. आत्ताही या ग्रामस्थांशी बोललो, काय बोलू आणि काय सांत्वन करु? सरकार अशा घटना घडल्यानंतर जागं होतं आणि धावपळ करत. माझं प्रामाणिक मत हे आहे की सर्वच पक्षांनी याबाबतीत तरी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे. मला आज एक प्रश्न विचारण्यात आला त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. प्रकल्पग्रस्त, आदिवासी यांच्यासह अनेक लोक आहेत ज्यांना असं आयुष्य जगावं लागतं. टांगती तलवार असते तशी दरड कधी अंगावर येईल ते त्यांना माहित नाही. अशा लोकांच्या पुनर्वसनाची एक ठोस योजना करणं आवश्यक आहे. मी मुख्यमंत्री असताना या योजनेला सुरुवात करत होतो मात्र त्यानंतर आमचं सरकार बदललं अशी खंतही व्यक्त केली.

उध्दव ठाकरे म्हणाले, सरकार कुणाचंही येवो पण अशा योजनांना स्थगिती देता कामा नये इतकी माणुसकी आपण ठेवली पाहिजे. तळियेला मी जाणार आहे तिथलाही आढावा घेणार आहे. आपण राजकारणी म्हणून जेव्हा मतं मागायला जातो तेव्हा लाज वाटली पाहिजे. या सगळ्यांना घरं दिली तरीही त्यांच्या उदरनिर्वाहाचीही सोय केली गेली पाहिजे. या प्रकारच्या योजना आखल्या पाहिजे. सरकार येणं, निवडणुका होणं हे होतच राहिल पण अशा सगळ्यांसाठी काम करण्याची आवश्यकता आहे असे मतही व्यक्त केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, बोलण्यासाठी माझ्याकडे काही शब्द नाहीत. ही दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर मी फक्त तोंड दाखवण्यासाठी आलो नाही. तर, भविष्यात तुमचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत असे आश्वासनही दिले.

पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, आसपासच्या वस्त्या आणि तुमचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी करू की पुन्हा अशा संकटाशी सामना करण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्रातील बऱ्याच वस्त्या दरडग्रस्त कधीही होऊ शकतात. पण, म्हणून आपण जबाबदारी टाळू शकत नाही. ही घटना घडण्यापूर्वी येथील पुनर्वसन झालं पाहिजे होते. पण, दुर्दैवाने ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तरुण आणि महिलांना नोकरीची व्यवस्था करावी. फक्त घर बांधून पुनर्वसन होणार नाही. यात राजकारण कुठेही आणणार नाही. राजकारणाच्या पलीकडे माणुसकी हा भाग असतो. पुनर्वसन होईपर्यंत ज्या गोष्टींची मदत लागेल, ती करू, असा विश्वास ग्रामस्थांना दिला.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *