Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून भाजपाने केला साजरा राज्यात ठिकठिकाणी भाजपाचे सेवा कार्य

रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर, कृत्रिम अवयवांचे वाटप, पूरग्रस्त कुटुंबांना धान्य वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

नागपूर येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर शहर अध्यक्ष जितेंद्र कुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे १५ हजार नागरिकांना सरकारी खात्यांकडे प्रलंबित असलेली विविध शासकीय कागदपत्रे देण्यात आली.
मुंबईत धारावीतील गणेश विद्यामंदिर येथे राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आ. प्रवीण दरेकर, ज्येष्ठ पत्रकार किरण शेलार, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्या प्रमुख उपस्थितीत गरीब कुटुंब आणि सफाई कामगार यांना धान्य वाटप करण्यात आले. कांदिवली ( पश्चिम ) येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान करणाऱ्यांना खा. गोपाळ शेट्टी, बाळा तावडे, कमलेश यादव, प्रतिभा गिरकर यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रे देण्यात आली.

लातूर येथे भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते स्वच्छता कार्य करणा-या भगिनींचा सत्कार आणि रेनकोट वितरण करण्यात आले. आमदार रमेशअप्पा कराड, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, ग्रामीण अध्यक्ष दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रेरणा होनराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठाणे येथे आमदार निरंजन डावखरे यांच्यातर्फे वाल्मिकी बांधवांना आणि महिला रिक्षाचालक भगिनींना रेनकोट व धान्य वाटप करण्यात आले. माजी राज्यसभा सदस्य डॉ.विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, नम्रता कोळी, सरचिटणीस विलास साठे, राजू सावंत उपस्थित होते. डहाणू येथे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांच्या उपस्थितीत महिलांना शिलाई मशीन आणि अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.

कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप केले. बार्शीटाकळी ( जि. अकोला ) येथे पूरग्रस्त गरजू परिवारांना आमदार हरिषभाऊ पिंपळे यांच्या तर्फे धान्य व आवश्यक सामुग्री किट चे वाटप करण्यात आले.
भाजपा वैद्यकीय आघाडी तर्फे परतुर ( जि. परभणी ) येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून औषधी व पौष्टिक गोष्टींचे वाटप केले गेले . ज्यांना विविध प्रकारचे विकार आहेत त्यांच्या पुढील तपासणीसाठी नोंदणी करण्यात आली . डॉ स्वप्नील मंत्री, डॉ सुप्रिया मंत्री, डॉ संजय पुरी, डॉ सुधीर आंबेकर, डॉ हरिप्रसाद ढेरे आदी यावेळी उपस्थित होते.

भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात दिव्यांग सहाय्यता अभियाना चे आयोजन केले होते. या अभियानाच्या माध्यमातून २ हजार दिव्यांगांना सुसह्य उपकरणे, कृत्रिम अवयव नोंदणी आणि मोजमाप तसेच रोजगार नोंदणी शिबिर घेण्यात आले. नूमवि, अहिल्यादेवी हायस्कूल, वसंतदादा विद्यालय , रेणूका स्वरूप, गोळवलकर विद्यालय, गोपाळ हायस्कूल, ज्ञानसाधना विद्यामंदिर यांसारख्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने, प्रमोद कोंढरे, हरिदास चरवड यावेळी उपस्थित होते.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *