Breaking News

Tag Archives: bjp

शरद पवार यांचा सवाल, त्यांची कॅटेगरी कोणती? , तर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ते मोठे नेते ते बोलले… काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात रंगला कलगीतुरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षांतर्गत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका घेतल्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडींवर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच त्यावरून खुद्द शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. आज …

Read More »

फडणवीसांच्या टीकेला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर, त्यांचा भाजपाने फौजदाराचा हवालदार केला…. अन् आमची माप काढवीत का?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील नेतेही कर्नाटकात प्रचार करत आहेत. रविवारी ७ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीतील एका प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करताना म्हणाले, राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकात काय करणार, …

Read More »

शरद पवार यांची टीका, मणिपूर सारखे राज्य सांभाळता येत नाही अन कर्नाटकात… कर्नाटकमधील ४० टक्क्याचे धोरण देशात राबविण्याचा काही जणांचा विचार

कर्नाटक निवडणुकीत निपाणी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांच्या प्रचारसभेला उपस्थित राहून इथल्या जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आज देशात वेगळे चित्र आहे. निवडणूक कर्नाटकमधील आहे, परंतु संपूर्ण देशाचे चित्र पाहिले तर नवनवीन समस्या दिसत आहेत. देशाच्या सीमेवरील राज्यात शांतता असणे गरजेचे आहे. मणिपूर येथे …

Read More »

नितेश राणे यांच्या त्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांचे खोचक उत्तर, आज हास्यदिन… संजय राऊत हे १० जून पूर्वी राष्ट्रवादीत जाणार असल्याचा राणेंचा दावा

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत हे १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांच्या बैठका झाल्या असून बोलणीही सुरु आहे, असा दावा आज सकाळी माध्यमांशी बोलताना केला. नितेश राणे याच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे यांनी …

Read More »

कर्नाटकात पुन्हा भाजपा….? शरद पवार यांनी केले निकालाचे भाकित काँग्रेस बाजी मारेल असा अंदाज

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघ्या तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कर्नाटकात थळ ठोकलेला आहे. त्यातच भाजपाच्या गळ्यात पुन्हा एकदा विजयाची माळ घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक नेते कर्नाटकात तळ ठोकून बसले आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे …

Read More »

संजय राऊत यांची टीका, मुख्यमंत्र्यांनी भाजपा उमेदवारांना खोके पाठवून….. बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेतून हकालपट्टी केली असती

सध्या कर्नाटकातील विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असून विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराची राळ उठविली जात आहेत. महाराष्ट्रातूनही काँग्रेस आणि भाजपाचे स्टार प्रचारक कर्नाटकात तळ ठोकून आहेत. तसेच भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या कर्नाटक दौऱ्यावरून संजय राऊतांनी …

Read More »

उध्दव ठाकरे यांच्या टीकेला भाजपाचे उत्तर, वेळ आली की मैदान सोडून… भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत दिले टिकेला उत्तर

बारसू रिफायनरी प्रकल्पाला होत असलेल्या स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने सत्ताधारी मंत्र्यांकडून तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला बारसू जागे संदर्भात पाठविलेल्या पत्राचा दाखला देण्यात येत आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी बारसू आणि सोलगांव येथील स्थानिकांशी संवाद साधला. त्यानंतर महाडमध्ये झालेल्या सभेत …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा, बजरंग बली की जय, मग कुठे गेली तुमची ५६ इंच छाती? काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही

बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांशी भेटण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे आज बारसू येथील आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन त्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे सांगितले. त्यानंतर महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी अनेक जण…. ते जर नसते तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते

शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. शरद पवारांनी उत्तराधिकारी नेमण्यासाठी समितीची स्थापना केली होती. पण, या समितीने शरद पवारांचा राजीनामा सर्वानुमते फेटाळला. यानंतर शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत पवारांनी अध्यक्षपदी कायम राहात …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा खोचक सवाल,… भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का? कातळशिल्पे वाचविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र पाठविणार

जागतिक वारसा वास्तूचा ठेवा असलेली कातळशिल्पे सोलगांव येथे असून बारसू येथे येऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पामुळे ही कातळशिल्प धोक्यात येणार आहेत. त्यामुळे ही कातळशिल्पे वाचविण्यासाठी आपण जागतिक संघटनेला पत्र लिहिणार असून पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे त्याची आठवणही पर्यावरण संघटनेला पत्र पाठवून करू देणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव …

Read More »