Breaking News

Tag Archives: bjp

आदित्य ठाकरेंचा इशारा, स्वतःला विकलं तेवढं पुरे, मुंबईचे एटीएम करू नका खोके सरकार मुंबईला विकायला निघालंय; मुंबईला विकू नका

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात आलेलं खोके सरकार हे फक्त मुंबई विरोधी नाही तर महाराष्ट्र विरोधी आहे. मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहेत म्हणत माझी मुंबई विकू नका, तिचं एटीएम करू नका अशा शब्दात आदित्य ठाकरे …

Read More »

सत्तेच्या गाजराची पुंगी निकामी झाल्याने महाविकास आघाडीची तिघाडी बिघडली भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

सत्तेची संधी दिसल्यामुळे एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी ही केवळ गाजराची पुंगी होती हे आता स्पष्ट झाले आहे. सत्ता जाताच या आघाडीची बिघाडी झाली असून एकत्र राहिल्यास तीन तिघाडा काम बिघाडा होईल याची त्यांना खात्री असल्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीत तिघांची तोंडे तीन दिशांना असल्याचे दिसू लागले …

Read More »

राष्ट्रवादीची खोचक टीका, पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत केली टीका

पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत भाजपावर खोचक टीका केली. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुनिल तांबे यांनी स्वतः उमेदवारी अर्ज न भरता आपला मुलगा सत्यजीत तांबे यास अपक्ष …

Read More »

ऊर्फी जावेदने तक्रार दाखल केल्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, माझा संघर्ष सुरुच राहील कोणीही कितीही माझ्या विरोधात तक्रारी दाखल केल्या तरी संघर्ष सुरुच राहणार

मागील काही दिवसापासून ऊर्फी जावेद आणि भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळला आहे. यापूर्वी चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेद हीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आज उर्फी जावेद हीने चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यापार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाल्या, कोणी …

Read More »

महेश तपासेंचा सवाल, एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही ;कुठे आहेत सदावर्ते – पडळकर शिंदे-फडणवीस सरकारकडून ९० हजार एसटी कर्मचारी विनावेतन

जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? आता कुठे आहेत हे दोघे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. महेश तपासे म्हणाले, राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप झालेला नाही. …

Read More »

चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल करत ऊर्फी जावेदने घेतली चाकणकरांची भेट पोलिस ठाण्यातही केली तक्रार दाखल

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री मॉडेल ऊर्फी जावेद हीच्या फॅशनवरून भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आघाडी उघडली होती. तसेच ऊर्फी जावेदच्या विरोधात मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतु या दोन्ही यंत्रणांकडून कोणतीच कारवाई न केल्याने चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेद …

Read More »

सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, भाजपामध्ये कर्तृत्वान महिला भले आमदार नसल्या तरी पण भाजपाला महिलांचा आदर नाही

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री आणि मॉडेल ऊर्फी जावेद हीच्या फॅशनवरून भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि ऊर्फी जावेद हीच्यात वाद सुरु आहे. तसेच या वादात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातही वाद निर्माण झडायला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …

Read More »

भाजपाची टीका, घटनाबाह्य रीतीने पद पटकावणाऱ्या ठाकरेंकडून महाराष्ट्राची फसवणूक शिवसेना पक्षप्रमुख पदावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

शिंदे फडणवीस सरकारच्या नावाने बोटे मोडत सरकारला घटनाबाह्य ठरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपदच घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे बाळासाहेबांवर निष्ठा असलेल्या तमाम शिवसैनिकांची आणि घटनाबाह्य पदाचा फायदा घेत मुख्यमंत्रीपद पटकावून महाराष्ट्राची फसवणूक केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी व पक्षप्रमुख पदावरून पायउतार व्हावे असे आव्हान प्रदेश भाजपाचे …

Read More »

हसन मुश्रीफ यांचा आरोप, किरीट सोमय्याकडून विशिष्ट लोकांना लक्ष्य नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि अस्लम शेख यांची नावे घेतल्याने केला आरोप

आज ईडीने पहाटेपासून हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुलीच्या घरावर छापे टाकत सर्व कागदपत्रांची तपासणी सुरु केली. त्यातच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या पाठोपाठ आता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे नाव घेतले. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत सोमय्या हे फक्त विशिष्ट …

Read More »

ठाकरे विरूध्द शिंदे, संघर्षावरील सुनावणी आता व्हेलॅनटाईन डे च्या दिवशी ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उभी फूट पाडत राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेनेचे आणि १० अपक्ष आमदार सोबत गेले. यापैकी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या मागणी पोटी उध्दव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव …

Read More »