Breaking News

राष्ट्रवादीची खोचक टीका, पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत केली टीका

पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत भाजपावर खोचक टीका केली.

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुनिल तांबे यांनी स्वतः उमेदवारी अर्ज न भरता आपला मुलगा सत्यजीत तांबे यास अपक्ष उमेदवार म्हणून भरायला लावला. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपाकडेही पाठिंबा मागणार असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे भाजपा असल्याचा राजकिय संशय गडद झाला. यावरून दिलीप वळसे-पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.

भाजपाने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली त्यामुळे या निवडणुकीत नवीन ट्वीस्ट आल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपाने अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणालाही दिला नाही किंवा अधिकृत उमेदवारही घोषित केला नाही असे ट्वीटमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

आज सकाळीच हे ट्वीट करत दिलीप वळसे पाटील यांनी भाजपावर थेट हल्लाबोल केला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *