Breaking News

ऊर्फी जावेदने तक्रार दाखल केल्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, माझा संघर्ष सुरुच राहील कोणीही कितीही माझ्या विरोधात तक्रारी दाखल केल्या तरी संघर्ष सुरुच राहणार

मागील काही दिवसापासून ऊर्फी जावेद आणि भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील वाद आता चांगलाच चिघळला आहे. यापूर्वी चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेद हीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आज उर्फी जावेद हीने चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यापार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाल्या, कोणी कितीही माझ्या विरोधात तक्रारी दाखल केल्या तरी माझा संघर्ष सुरुच राहणार आहे. माझा संघर्ष हा त्या नंगानाचाच्या, विकृतीच्या विरोधात असल्याचा पुर्नरूच्चार केला.

अभिव्यक्ती स्वांतत्र्य मलाही माहित आहे. तुम्ही तुमच्या घरात काहीही करू शकता. मात्र समाजात वावरताना मात्र त्या पध्दतीचे कपडे कसे घालू शकता असा सवालही त्यांनी यावेळी केला.

यावेळी चित्रा वाघ यांनी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात पुन्हा एकदा टीका करत त्यांच्या विरोधातील लढाई माझी सुरुच असून राठोड यांना क्लीनचीट कोणी दिली हे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जाऊन विचारा असे आवाहनही के़ले.

चित्रा वाघ म्हणाल्या, ज्यावेळी रस्त्यावरील लढाईची गरज होती. त्यावेळी संजय राठोडांच्या विरोधात मी लढले. आता न्यायालयात मी गेली आहे. न्यायालयात खटला दाखल केलेला आहे. यामध्ये लपवण्यासारखं काही नाही, ते तुम्ही कधीही तपासू शकता. दुसरी गोष्ट त्यांना मंत्री करत असताना माझी जी भूमिका आहे, ती मी मांडलेली आहे. माझी लढाई संपलेली नाही, हे तेव्हाही बोलले मी आणि आजही बोलते आहे. तिसरी गोष्ट यामध्ये मंत्रीपद यासाठी दिलं, कारण त्यांना क्लिनचीट दिली आहे. आता क्लीनचिट कोणी दिली? आमचं सरकार तर आता आलं आहे असल्याची सारवासारव केली.

हे तुम्ही जे मला प्रश्न विचारत आहात, याचं उत्तर तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलं पाहिजे. त्यावेळचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारलं पाहिजे. पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता जे आजही सेवेमध्ये आहेत त्यांना विचारलं पाहिजे, की बाबानों तुम्ही तिघांनी काय म्हणून या संजय राठोडला क्लीनचिट दिली? तुम्ही क्लिनचीट दिली म्हणून या सरकारने त्यांना मंत्री बनवलं. तरीही माझा विरोध कायम आहे, असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, आता न्यायालयीन प्रकरण आहे आणि माझा न्यायालयावर विश्वास आहे. मी असं म्हणणाऱ्यामधील नाही की माझ्या बाजूने निकाल दिला तर माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि नाही दिला तर हे पण सरकारच्या दावणीला बांधलं का? असं म्हणणाऱ्यामधील मी नाही. माझा पूर्ण विश्वास आहे की यामध्ये मला न्याय मिळेल आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मी खरं बोलते की खोटं हे तुम्ही तपासू शकता आणि त्यावर तुम्ही मला शंभर प्रश्न विचारू शकता असंही त्या म्हणाल्या.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *