Breaking News

संजय राऊत यांची टीका, मुख्यमंत्र्यांनी भाजपा उमेदवारांना खोके पाठवून….. बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेतून हकालपट्टी केली असती

सध्या कर्नाटकातील विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असून विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराची राळ उठविली जात आहेत. महाराष्ट्रातूनही काँग्रेस आणि भाजपाचे स्टार प्रचारक कर्नाटकात तळ ठोकून आहेत. तसेच भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या कर्नाटक दौऱ्यावरून संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे भाजपाचा प्रचार करून मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याचं ते म्हणाले. ट्वीट करत राऊतांनी यासदंर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली.

संजय राऊत आपल्या ट्विट मधून म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक उचापती आहेत, त्यांना आम्ही धडा शिकवू, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी इशारा दिला आहे. त्याच बोम्मईंच्या पंखाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाहत आहेत. सीमावादानंतर शिंदे व त्यांची टोळी या भागात फिरकली सुद्धा नाही. याउलट एकीकरण समितीच्या विरोधातील भाजपा उमेदवारांना खोके पाठवून त्यांनी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका केली.

सीमा भागातील एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत व्हावेत म्हणून शिंदे यांनी जोर लावला आहे. त्यांची शिवसेना ही नकली शिवसेना आहे. हे यांचं ढोंगी हिंदूत्त्व आहे. शिंदे महाराष्ट्राचे वैरी आहेत. बाळासाहेबांनी या कृत्याबद्दल शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती, अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आणि उद्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते कर्नाटकामध्य भाजपा उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतील. तसेच कापू आणि उडपीमध्ये होणार भाजपाच्या रोड शो मध्ये सहभागी होतील. सोमवारी उडपी येथील श्रीकृष्ण मंदिरालाही भेट देऊन संध्याकाळी महाराष्ट्रात परतणार असल्याची माहिती आहे.

 

Check Also

नाना पटोले यांची घोषणा, विधान परिषदेची कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार

आगामी विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाईल. मागील काही महिन्यांपासून काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *