Breaking News

कर्नाटकात पुन्हा भाजपा….? शरद पवार यांनी केले निकालाचे भाकित काँग्रेस बाजी मारेल असा अंदाज

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघ्या तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कर्नाटकात थळ ठोकलेला आहे. त्यातच भाजपाच्या गळ्यात पुन्हा एकदा विजयाची माळ घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक नेते कर्नाटकात तळ ठोकून बसले आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे हिरिरीने प्रचार करत आहेत. तसेच या निवडणूक निकालाचा परिणाम देशातील इतर राज्यांच्या निवडणूकांवर होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कर्नाटक निवडणूकीचे भाकित केले असून कर्नाटकात काँग्रेसच जिंकेल असा दावा केला.

शरद पवार हे आज पंढरपूर दौऱ्यावर असून येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, बंगालमध्ये भाजपाची सत्ता नाही. देशाचा नकाशा पाहिलास अनेक राज्यात भाजपा सत्तेवर नाही. इतर राज्यात बिगर भाजपा सरकार आहेत, कर्नाटकमधील स्थानिक लोक भाजपावर नाराज आहेत, त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, असा दावाही यावेळी केला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आपण धर्मनिरपेक्ष संकल्पना स्वीकारली आहे. निवडणुकीला उभं राहताना आपण ही शपथ घेतो. त्यात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख आहे. निवडणुकीत एखादा धर्म किंवा धार्मिक प्रश्न उभं करणं आणि त्यातून वेगळं वातावरण तयार करणं हे देशाच्या दृष्टीने चुकीचं आहे. देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात याचं आश्चर्य वाटतं असंही म्हणाले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. त्यावरूनही शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, कोणीतरी सिरियस (महत्त्वाचं) बोलण्यात ज्यांचा लौकीक आहे अशा लोकांना उत्तर द्यावं. या पोरासोरांच्या वक्तव्यावर काय बोलणार असा उपरोधिक टोला राणे पुत्रांचे नाव न घेता लगावला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *