Breaking News

Tag Archives: bjp

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा अर्धवार्षिक गुन्हे परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आदेश

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिले. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक गुन्हे परिषदेचे आयोजन मुंबईतील पोलीस मुख्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाकडून मिळणार घसघशीत बक्षिसे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन २०२३ च्या गणेशोत्सवात उत्कृ्ष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या पुरस्कार रकमेत वाढ करण्यात आली आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख रुपये व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वने, मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्या सततच्या आरोपावर भाजपाचे बावनकुळे म्हणाले, हिंमत असेल तर एकदा… हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुत आहात तर सांगाच तुमचे सुत कोणाशी जुळले

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून यवतमाळ मधील दिग्रस येथे काल भाषण करताना पोहरादेवीची शपथ घेत सांगितलं होतं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यांनी जगदंबेची शपथ घेऊनही हीच गोष्ट सांगितली. पण …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला,…तुम्हाला तर वायपेयींनी केराच्या टोपलीतच टाकलं होतं ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्षच गेला

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही शून्य होता, तेव्हा बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं. नाही तर वाजपेयींनी तुम्हाला तेव्हाच केराच्या टोपलीत टाकलं होतं. जर बाळासाहेब ठाकरे नसते, ते आताच्या पंतप्रधानाच्या मागे उभे राहिले नसते तर मोदींचं नाव सर्वोत्कृष्ट पंतप्रधानांच्या यादीत राहिलं असतं का? असा संतप्त …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पलटवार,…घरात बसलो पण तुमच्यासारख्या घरफोड्या केल्या नाहीत बाळासाहेबांच्या आदेशाने तुम्हाला शिवसैनिकांनी खांद्यावर बसविलं पण तुम्ही आम्हालाच संपविण्याचा प्रयत्न

काल यवतमाळ येथील दिग्रस येथे शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख्य उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्यांनी अकोला आणि अमरावती येथील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाबरोबरचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मागील काही दिवसांपासून …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल; तुम्ही तर दोन फुल एक हाफ, मग त्रिशुळ कसे? यवतमाळमधील दिग्रस येथील जाहिर सभेत उद्धव ठाकरे यांचे भाजपावर टीकास्त्र

राज्यात महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भाजपाकडून तीन चाकांची रिक्षा अशी टीका केली जात असे. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या दोन चाकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे ही आता सहभागी झाल्यानंतर गडचिरोली येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता हे आमचे त्रिशुळ असल्याचे …

Read More »

छगन भुजबळ यांचे पवारांना प्रत्युत्तर, मीच येवल्याला आलो… गोंदिया पर्यंत माफी मागणार का? भविष्यकाळात आणखी गौप्यस्फोट करणार

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नुकतेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेला येवल्यातून पुन्हा एकदा पक्ष बांधण्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. काल येवल्यातील पहिल्याच जाहिर सभेत बोलताना शरद पवार यांनी माझा अंदाज कधी चुकत नसतो. पण यावेळी चुकला असे सांगत मी तुमची माफी मागायला आलोय असे सांगत छगन भुजबळ …

Read More »

शिवसेनाः दोन्ही गटातील ५४ आमदारांना विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसा लेखी म्हणणे सादर करण्यास सात दिवसांची मुदत

शिवसेना नेमकी कोणाची आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्यादृष्टीने महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊनही जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ लोटला गेला. विशेष म्हणजे त्यास येत्या ११ जुलै रोजी ९० दिवस पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या पात्र-अपात्रेबाबतच्या कारवाईस सुरुवात केली आहे. …

Read More »

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्राची मान्यता वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची माहिती

परभणी येथील १०० विद्यार्थी क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या ४३० रुग्णखाटांच्या रुग्णालयास केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश सुरू होणार आहे. राज्यातील हे २५ वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य आणि क्रीडा व …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या त्या टीकेवर शरद पवार यांनी दिले या तीन शब्दात उत्तर तोंडात अंजीर हातात खंजीर असल्याची मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती टीका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेने पाठोपाठ झालेल्या बंडखोरीची चर्चा अद्याप खाली बसायला तयार नाही. त्यातच पक्षाच्या बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा बंडखोरांच्या मतदारसंघातून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. मात्र गडचिरोली येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघेजण …

Read More »