Breaking News

मराठा आरक्षण वाचवा: ठिकठिकाणी आंदोलन आमदार आणि खासदाराच्या घरासमोर निदर्शने

मुंबई: प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीकरीता राज्यात विविध जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. पुणे, नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबादेत, सोलापूरसह अनेक ठिकाणी मराठा समाजाच्यवतीने आंदोलने करण्यात आले. यावेळी मराठा समाजाकडून बहुतांश लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलने करण्यात आली. त्यामुळे अनेक आमदार, खासदारांना घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले.

सोलापूरात खासदार डॉ.जयसिध्देश्वर यांच्या मठासमोर आंदोलन करण्यात आले. तर आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी या सर्वांना घेराव घालत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी केली. यापैकी आमदार प्रणिती शिंदे यांनी मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करत महाविकास आघाडी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत स्थगिती उठवावी याकरिता राज्य सरकार न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

Check Also

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभुमीवर गर्दी नको, घरातूनच अभिवादन करा अभिवादन, मानवंदनेचे थेट प्रक्षेपण; ऑन-लाईन माध्यमातून दर्शन

मुंबई : प्रतिनिधी महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *