नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके आणि भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे-पाटील यांच्यात लढत झाली. या मतदारसंघातील निवडणूकीच्या दरम्यान निलेश लंके यांच्या शैक्षणिक गुणवतेवरून आणि इंग्रजी भाषा येत नसल्याचा मुद्दा प्रचारात उपस्थित झाला होता. तसेच या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …
Read More »सोलापूरातून प्रणिती शिंदे, तर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर भाजपाचे राम सातपुते आणि रणजीतसिंग निंबाळकर पिछाडीवर
सोलापूर लोकसभा मतदारसंघात मागील २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणूकीपासून भाजपाच्या ताब्यात गेला होता. तर माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील राजकीय घराण्यानेही भाजपाचा हात धरला होता. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ भाजपाकडे गेले होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत मात्र माढ्यात आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा महाविकास आघाडीने खेचून घेणार असल्याचे दिसून …
Read More »प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द
मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम कार्यकर्ता निर्माण करता आला नाही. त्यामुळे भाजपाला प्रत्येक लोकसभा निवडणूकीत मुंबई-पुण्याकडे स्थायिक झालेल्या एखाद्या व्यावसायिकाला किंवा एखाद्या धार्मिक गुरूला लोकसभेसाठी उमेदवार म्हणून पुढे आणावे लागले. यंदाही भाजपाने स्थानिक कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याऐवजी मुंबई-पुण्यात स्थायिक झालेले व्यावसायिक …
Read More »काँग्रेसची ५७ जणांची तिसरी यादी जाहिरः महाराष्ट्रातील ७ जणांना उमेदवारी बँक खाती सील केल्यानंतर संध्याकाळी उशीरा काँग्रेसने जारी केली यादी
आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या उधळलेल्या वारूला रोखण्यासाठी आस्ते कदमचा आणि सावध पवित्रा घेत प्रत्युत्तर देण्याचे काम सुरु केले आहे. भाजपाने आतापर्यंत तीन लोकसभा उमेदवारांच्या याद्या प्रसिध्द केल्या. परंतु तिसऱ्या यादीतील अनेक वादग्रस्त उमेदवारांना नारळही दिला तर काही उमेदवारांनी दिलेले उमेदवारीचे तिकिट नाकारत निवडणूकीच्या रणागंणापासून दूर राहणेच पसंत केले. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने …
Read More »आरोग्य व्यवस्थेवरून आमदार प्रणिती शिंदे आणि मंत्री सावंत यांच्यात खडाजंगी
राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून आरोग्य विभागाच्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या रूग्णालयांबरोबरच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढण्यात येत आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्याकडून ठोस उत्तर मिळण्याऐवजी अशा गोष्टींना पाठीशी घालण्यात येत असल्याची चर्चा सध्या …
Read More »काँग्रेसच्या कार्याध्यक्षांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप कुणाल पाटलांकडे अमरावती व नागपूर, प्रणिती शिंदे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्याध्यक्षांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप केले आहे. यात प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्याकडे अमरावती व नागपूर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्याकडे कोकण आणि मराठवाडा, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर यांच्याकडे …
Read More »नाना पटोले यांची मागणी, सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची होणारी लूट थांबवा सेतू कार्यालये अद्ययावत करण्यासाठी शासनाचे धोरण काय?
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले सेतू कार्यालयातून घ्यावे लागतात. ही सेतू कार्यालये जनतेच्या सुविधांसाठी आहेत परंतु या सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची सर्रास लूट केली जात आहे. १५ ते २० रुपयांच्या दाखल्यासाठी २०० ते ३०० रुपये घेतले जातात, जनतेची होणारी ही लूट सरकारने थांबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »पटोलेंचा पुन्हा स्वबळाचा नारा; मोदी सरकारला जागा दाखवून देणार शेतक-यांशी संवाद साधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उत्तर महाराष्ट्र दौ-याला सुरुवात
फैजपूर-जळगाव: प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार हे इंग्रज राजवटीपेक्षा जुलमी व अत्याचारी आहे. हे सरकार शेतकरी, कष्टकरी विरोधी असून शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवून देशोधडीला लावण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी तीन काळे कृषी कायदे आणले आहेत. केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार घालवल्याशिवाय या देशातील शेतकरी, कष्टकरी यांचे अच्छे दिन येणार नाहीत …
Read More »दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे मंत्री व आमदार सायकलवरून विधानभवनात प्रदेश काँग्रेसची माहिती
मुंबईः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निचांकी पातळीवर असताना देशात मात्र इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी १ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री …
Read More »प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर नाना पटोलेंनी जाहिर केली टिम ६ कार्याध्यक्ष १० उपाध्यांचा समावेश
मुंबईः प्रतिनिधी राज्यात आगामी काळात काँग्रेसला चांगले दिवस आणण्याकरीता प्रदेश पक्षनेतृत्वात बदल करत माजी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदी निवड होताच पटोले यांनी आपली नवी टिम तयार करत काँग्रेसने सहा कार्याध्यक्ष नियुक्त केले. यात मुंबईतून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान या दोघांची …
Read More »