Breaking News

काँग्रेसची ५७ जणांची तिसरी यादी जाहिरः महाराष्ट्रातील ७ जणांना उमेदवारी बँक खाती सील केल्यानंतर संध्याकाळी उशीरा काँग्रेसने जारी केली यादी

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या उधळलेल्या वारूला रोखण्यासाठी आस्ते कदमचा आणि सावध पवित्रा घेत प्रत्युत्तर देण्याचे काम सुरु केले आहे. भाजपाने आतापर्यंत तीन लोकसभा उमेदवारांच्या याद्या प्रसिध्द केल्या. परंतु तिसऱ्या यादीतील अनेक वादग्रस्त उमेदवारांना नारळही दिला तर काही उमेदवारांनी दिलेले उमेदवारीचे तिकिट नाकारत निवडणूकीच्या रणागंणापासून दूर राहणेच पसंत केले. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली तिसरी यादी जाहिर केली. विशेष म्हणजे काँग्रेसने आपल्या संभावित १७ लोकसभा उमेदवारांपैकी ७ ठिकाणचे उमेदवारांच्या यादीसह ५७ जणांची यादी जाहिर केली.

काँग्रेसने जारी केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत कोल्हापूरचे उमेदवार शाहु महाराज, सोलापूरातून विद्यमान आमदार तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे, लातूरमधून शिवाजीराव कलगे, पुण्यातून विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदूरबार मधून माजी मंत्री के.सी पाडवी यांचे यांच्या मुलाला उमेदवारी काँग्रेसकडून जाहिर करण्यात आली आहे.

याशिवाय कर्नाटकातून गुजरात, अरूणाचल प्रदेश, राजस्थान, तेलगंणा, पश्चिम बंगाल आदी राज्यातील उमेदवारांची यादीही जाहिर करण्यात आली.

 

Check Also

एनआयएकडून रामेश्वरन कॅफे स्फोटप्रकरणातील आरोपींना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटामागील मुख्य आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *