Breaking News

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक; मोदींच्या पराभवाला सुरुवात? काँग्रेसनंतर थेट लोकनियुक्त सरकारच्या मुख्यमंत्र्याला हात घातला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २१ मार्च रोजी अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीकडून कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईपासून संरक्षण देण्यास नकार दिल्याच्या काही तासांनंतर, विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगेच अटक करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ५५ वर्षीय नेत्याच्या अटकेमुळे त्यांच्या आम आदमी पार्टी (आप) कडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पक्षाने म्हटले आहे की अरविंद केजरीवाल “दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. गरज पडली तर ते तुरुंगातून सरकार चालवतील.” तर दुसऱ्याबाजूला अरविंद केजरीवाल यांनी नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्रीपद सोडावे, अशी मागणी भाजपाने केली.

ईडीने आज १० व्यांदा चौकशी नोटीस बजावण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. परंतु अरविंद केजरीवाल यांनी नोटीस स्विकारण्याऐवजी थेट उच्च न्यायालयात धाव घेत अटकेपासून संरक्षण मागितले. परंतु उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार कळविल्यानंतर रात्री उशीरा काही तासांनंतर, ईडीने अटकेची कारवाई सुरु केली. त्यानंतर अखेर संध्याकाळी अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या सक्तीच्या कारवाईपासून संरक्षण मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिला. अखेर ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करत ईडी कार्यालयात नेले.

आपचे राष्ट्रीय संयोजक आज रात्री सर्वोच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेऊ शकतात या अटकळीला पूर्णविराम देत त्यांचे वकील आणि ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले की, अशी कोणतीही हालचाल सुरू नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्ली उच्च न्यायालयाने आपच्या राष्ट्रीय संयोजकाला न्यायालायाने कोणत्याही जबरदस्ती कारवाईपासून संरक्षण देण्यास नकार दिल्याच्या काही तासांनंतर, विद्यमान मुख्यमंत्र्यांची ही पहिली अटक झाली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ५५ वर्षीय नेत्याच्या अटकेमुळे त्यांच्या आम आदमी पार्टी (आप) कडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान महाराष्ट्रातूनही शिवसेना उबाठा गटाकडून आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडूनही केंद्र सरकारच्या या अघोषित आणिबाणीचा निषेध नोंदवित केजरीवाल यांच्या अटकेवर टीका केली.

दरम्यान आम आदमी पार्टीकडून भाजपाच्या कार्यालयासमोर उद्या निदर्शने करण्यात येणार असल्याचे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जाहिर केले.

मागील तीन महिन्यापासून ईशान्य भारतातील मणिपूर ते मुंबई अशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला बहुतांष राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. तसेच राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले मुद्देही स्थानिक नागरिकांनी चांगलीच साथ दिली. त्यातच होत असलेल्या लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत आधीच प्रसारमाध्यमातून गायब केलेल्या काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या चारही संघटनांची बँक खाती फ्रिज केली. याविषयीचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसला काही तासांचा अवधी उलटून जात नाही तोच भाजपाने ईडीच्या माध्यमातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात अटकेची कारवाई सुरु केली.

वास्तविक पाहता देशात आगामी निवडणूकीत कोणत्याही परिस्थितीत विरोधकांचा पर्याय नागरिकांना दिसू नये यादृष्टीकोनातून विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना टार्गेट करण्याचे काम भाजपाने सुरु केले. त्यामुळे भाजपाच्या अर्थात नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्या पराभवाची नांदी सुरु झाल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *