Breaking News

Tag Archives: लोकसभा निवडणूका

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, २६ फेब्रुवारी, २०२४ मधील तरतुदीनुसार २६ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत,जाहिरात प्रसिद्ध होऊन …

Read More »

या बचत योजनांवरील व्याज दर तीन महिन्यांसाठी जैसे थे निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाने केली घोषणा

सध्या देशात लोकसभा निवडणूकांचा कालावधी सुरु आहे. देशातील निवडणूका या सात टप्प्यात होत असून यात जवळपास तीन महिने हा निवडणूकीचा हंगाम असाच सुरु राहणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाने मोठा निर्णय जाहिर केला आहे. केंद्र सरकारकडून चालविण्यात येत असलेल्या योजनांवरील एप्रिल-जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी यासारख्या …

Read More »

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक; मोदींच्या पराभवाला सुरुवात? काँग्रेसनंतर थेट लोकनियुक्त सरकारच्या मुख्यमंत्र्याला हात घातला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २१ मार्च रोजी अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीकडून कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईपासून संरक्षण देण्यास नकार दिल्याच्या काही तासांनंतर, विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगेच अटक करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान …

Read More »

राज्यात पाच टप्प्यातील निवडणूकीत इतके मतदार करणार मतदान

लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे, २०२४ या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालय …

Read More »

निवडणूकीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातः नवे दर आजपासून देशातील कंपन्यांनी दरात २ रूपयांनी केली घट

देशात निवडणूकीचा माहोल सुरु झालेला आहे. मागील पाच वर्षात विरोधी पक्षांसह सर्वसामान्य जनतेकडून सातत्याने महागाईच्या मुद्यावरून आंदोलन करत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करण्याची मागणी केली. परंतु केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केले. मात्र देशात लोकसभा निवडणूकीचे वारे वाहायला लागले आहेत. यापार्श्वभूमीवर २०२२ नंतर तेल कंपन्यांनी (OMCs) गुरुवारी …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर देशात CAA कायदा लागू

वादग्रस्त नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2019 (CAA) च्या अंमलबजावणीचे नियम आज अधिसूचित केले जातील, अशी घोषणा गृह मंत्रालयाने केली आहे. नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 नावाचे हे नियम CAA-2019 अंतर्गत पात्र असलेल्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करतील. अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सादर केले जातील ज्यासाठी वेब पोर्टल प्रदान …

Read More »

लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या भीतीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ३३ मोठे निर्णय

लोकसभेचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता कधीही जाहिर होऊ शकते या भितीने राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकार आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व विभाग आणि राज्यातील जनतेच्या दृष्टीकोनातून काही महत्वाचे निर्णय घेतले. तर राज्य सरकारकडून …

Read More »

मुंबई भाजपाकडून सहा डिजिटल प्रचार रथाचे उद्घाटन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाने प्रचारात आघाडी घेतली असून मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते आज सहा डिजिटल प्रचार रथाला झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. दादर येथील मुंबई भाजपा कार्यालयाच्या आवारात प्रचार रथ शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डिजिटल प्रचार रथाच्या माध्यमातून मुंबईतील सहाही लोकसभा क्षेत्रातील …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा विश्वास, स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या ६ जागा जिंकू

आम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान ६ लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही ४२ मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत, त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले …

Read More »

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनावर तीन डिसेंबरचे सावटः राज्यात मध्यावधी लागणार ?

देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम आता संपत आला आहे. पाच राज्यांपैकी मिझोरम, छत्तीसगड, राजस्थान ही तीन राज्ये पुन्हा एकदा काँग्रेस राखण्याच्या तयारीत आहेत. तर तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यात काँग्रेसचे सरकार पुन्हा एकदा स्थानापन्न होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी या पाचही राज्यांचा स्पष्ट कौल भाजपाला की, काँग्रेसला …

Read More »