Breaking News

Tag Archives: loksabha election

मतदारांना भुलविण्यासाठी राज्य सरकारची अशीही चलाखी दुष्काळ, खरीप आणि गृहनिर्माण योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या कामाला गती

मुंबईः प्रतिनिधी निवडणूका आल्या की त्या जिंकण्यासाठी सत्ताधारी, विरोधकांकडून मतदारांना भुलविण्यासाठी कोणती ना कोणती लोकानुनयी घोषणा केली जाते. मात्र निवडणूका जिंकण्यासाठी राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारने थेट सरकारी निधीचाच वापर करत मागील दोन वर्षापासून रखडलेल्या शेतकऱ्यांना द्यावयाची नुकसान भरपाईचा निधी आणि शहरी भागातील नागरीकांच्या गृहनिर्माण प्रकल्पांना निधी पुरविण्याच्या हालचालींना मोठ्या प्रमाणावर वेग …

Read More »

लोकसभा निवडणुकीत महिलांची मते निर्णायक ठरणार महिला मतदारांचा टक्का वाढला

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. 2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची …

Read More »

३ विद्यमान खासदारांसह १२ जण राष्ट्रवादीकडून रिंगणात राजू शेट्टी यांना पाठिंबा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, साताराचे उद्यनराजे भोसले, कोल्हापूरचे धनंजय महाडीक या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करत रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांना उमेदवारी जाहीर करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. याशिवाय ठाणे लोकसभेसाठी आनंद परांजपे, …

Read More »

सरकारी जाहीरातींमुळे आचार संहितेचा भंग होतोय जाब विचारून गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी पासून लागू झालेली असतानाही राज्यभरातील एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोल पंपासहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी प्रचाराच्या जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला जाब विचारून संबधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »

राज्यातील जागा वाटप आणि परिस्थितीचा काँग्रेस आढावा घेणार गुरूवारी गांधी भवन येथे होणार बैठक

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत असलेली परिस्थिती आणि संभावित विजयी जागांचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी सकाळपासून प्रदेश काँग्रेस कार्यकारणीची बैठक होणार आहे. ही बैठक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. ऐन लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेली …

Read More »

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा आमदार काँग्रेसच्या वाटेवर आमदार सतीश चव्हाण हाताच्या पंजावर लढविणार निवडणूक

औरंगाबाद : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण हे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.अब्दुल सतार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच इतर उमेदवारांची नावे म्हणून जालना मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे किंवा मी स्वतः यांच्यापैकी एक उमेदवार …

Read More »

पार्थसाठी कि अंतर्गत राजकारणामुळे पवारांची निवडणूकीतून माघार ? मावळमधून मात्र पार्थ पवारांची उमेदवारी निश्चित

पुणे-सोलापूरः प्रतिनिधी राज्यातील आणि देशपातळीवरील हेवीवेट नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी आतापर्यंत घेतलेला निर्णय कधी मागे फिरविल्याचे ऐकिवात नाही. परंतु यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेली उमेदवारी शरद पवार यांनी मागे घेतल्याने केवळ पार्थच्या नावाखाली की सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणाचा फटका बसण्याच्या भीतीने पवारांनी मागे …

Read More »

२९ एप्रिलला मुंबई महानगरात आणि नंदूरबार मध्ये मतदान मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची पत्रकार परिषदेत घोषणा

मुंबई : प्रतिनिधी १७ व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून आजपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.  महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे, तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्वनी कुमार यांनी …

Read More »

देशात ७ तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान २३ मे ला मतमोजणी होणार असल्याची निवडणूक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी विद्यमान लोकसभेचा कार्यकाल जून महिन्यात संपणार असल्याने तत्पूर्वी नवी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता आज रविवारपासून लागू झाल्याचे जाहीर करत देशात एकूण ७ टप्प्यात तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात निवडणूका घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी केली. तसेच यंदाच्या निवडणूकीत व्हीव्हीपँट मशिन्स …

Read More »

अधिकाऱ्यांकडून फायलींचा निपटारा करण्याच्या कामाला गती निवडणूकीची आचारसंहिता ८ मार्चला लागू होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता ८ मार्च रोजी लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात फायलींच्या निपटाऱ्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. यामध्ये विशेषत वित्त विभाग, नगरविकास विभाग, गृहनिर्माण विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरु असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील विकास कामांच्या अनुषगांने …

Read More »