Breaking News

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम कार्यकर्ता निर्माण करता आला नाही. त्यामुळे भाजपाला प्रत्येक लोकसभा निवडणूकीत मुंबई-पुण्याकडे स्थायिक झालेल्या एखाद्या व्यावसायिकाला किंवा एखाद्या धार्मिक गुरूला लोकसभेसाठी उमेदवार म्हणून पुढे आणावे लागले. यंदाही भाजपाने स्थानिक कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याऐवजी मुंबई-पुण्यात स्थायिक झालेले व्यावसायिक आणि सध्या माळशिरसचे आमदार म्हणून परिचित असलेले राम सातपुते यांना पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीसाठी सोलापूरातून उमेदवारी दिली. त्यामुळे या निवडणूकीत प्रणित शिंदे विरूध्द भाजपाचे राम सातपुते यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी जाहिर करताच काँग्रेसच्या दोन टर्म आमदार राहिलेल्या आणि यंदा पहिल्यांदाच सोलापूरातून लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांच्यात सामना होणार आहे. मात्र भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी जाहिर करताच स्थानिक म्हणून प्रणिती शिंदे यांनी थेट राम सातपुते यांना जाहिर पत्र लिहीत, सोलापूरची भूमी ही सर्वधर्मसमभावाची भूमी आहे. इथ सर्वांना मत मांडण्याची संधी मिळते. मग तो इथला असो किंवा बाहेरचा असे सांगत स्थानिक आणि उपरे अशी लढत एकप्रकारे होणार असल्याचा इशारा राम सातपुते यांना देत सोलापूरची लेक म्हणून सोलापूरात स्वागत करत असल्याचेही प्रणिती शिंदे यांनी या पत्रात आवर्जून नमूद केले

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी अपेक्षित असतं. लोकशाहित जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं अशी अपेक्षाही यावेळी उपस्थित केली.

तसेच पुढे प्रणिती शिंदे आपल्या पत्रात म्हणाल्या की, पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहिचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरोधात उभे राहु आणि समाजात फूट न पाडता समाजाच्या एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू असे आवाहनही यावेळी केले.

प्रणिती शिंदे यांनी लिहिलेल्या पत्राला राम सातपुते यांनी उलट टपाली पत्रानेच उत्तर देत केलेल्या स्वागताबद्दल धन्यवाद देत २०१९ सालापासून माळशिळस विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याची आठवण करून देत आमदार झाल्यापासून ते आजतागयत मतदारसंघातील जनतेच्या सेवेत माझ्या परिने, प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केल्याचे राम सातपुते यांनी उलट टपाली प्रणिती शिंदे यांना कळविले.

पुढे राम सातपुते म्हणाले की, भाजपाचा कार्यकर्ता असल्याने तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्राला सार्थ ठरवत समाजाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजाता धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एकढ वर्ष राजकारण केलंय हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलं असल्याचा टोलाही यावेळी लगावला.

 

राम सातपुते पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणीची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या ऊसतोड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भाजपाने जो काही विश्वास दाखविला त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरविण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहणार अशी ग्वाहीही यावेळी दिली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *