Breaking News

Tag Archives: ram satpute

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम कार्यकर्ता निर्माण करता आला नाही. त्यामुळे भाजपाला प्रत्येक लोकसभा निवडणूकीत मुंबई-पुण्याकडे स्थायिक झालेल्या एखाद्या व्यावसायिकाला किंवा एखाद्या धार्मिक गुरूला लोकसभेसाठी उमेदवार म्हणून पुढे आणावे लागले. यंदाही भाजपाने स्थानिक कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याऐवजी मुंबई-पुण्यात स्थायिक झालेले व्यावसायिक …

Read More »

‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता तक्रारी कराव्यात भाजपा आमदार नितेश राणे यांचे आवाहन

राज्यातील ‘लव्ह जिहाद’ च्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध असून राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणला जाईल असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी केले. ‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता पोलिसांकडे तसेच आंतरधर्मीय विवाह समितीकडे तक्रारी कराव्यात असे आवाहनही आ. राणे यांनी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

शरद पवारांचा सभागृहात एकेरी उल्लेख करणार्‍या राम सातपुतेच्या विरोधात राष्ट्रवादी आमदार आक्रमक… अखेर भाजप आमदार राम सातपुतेंनी मागितली माफी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सभागृहात एकेरी उल्लेख करणार्‍या भाजपा आमदार राम सातपुते यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अखेर राम सातपुते यांना सभागृहातच माफी मागावी लागली. विशेष म्हणजे भाजपा आमदार आशिष शेलार …

Read More »

भाजपाच्या त्या १२ आमदारांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव वर्षभरासाठी निलंबित करण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात धाव घेतली

नवी दिल्ली: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे संपुष्टात आलेले आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक असलेली माहिती केंद्रातील भाजपा सरकारने द्यावी असा ठराव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेत राज्य सरकारने मांडला. त्यावेळी वेळी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याबरोबर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजपा आमदारांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल १२ जणांना वर्षभरासाठी निलंबित केल्याप्रकरणी भाजपाच्या त्या …

Read More »

तालिका अध्यक्षांना शिवीगाळ-धक्काबुक्की केल्याने भाजपाचे १२ आमदार वर्षासाठी निलंबित घडलेल्या घटनेची भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आपबीती

विरोध असताना ओबीसी ठराव आवाजी मतदानाने मंजूर केल्याचा राग मनात धरून सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना भाजपा सदस्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची दुर्दैवी घटना घडली. झाल्याप्रकाराने विधानसभेचे कामकाज जवळपास १ तासासाठी तहकूब करावे लागले. अखेर झाल्याप्रकारावर सभागृहातच चर्चा करण्याचे ठरले. त्यानुसार तालिका अध्यक्ष …

Read More »