Breaking News

कर्नाटकातील खाणसम्राट जर्नादन रेड्डी यांची भाजपात वापसी

कर्नाटकातील बेल्लारीतील प्रसिध्द खाण व्यवसायिक आणि कल्याण राज्य प्रगती पक्षाचे संस्थापक आमदार जी. जनार्दन रेड्डी यांनी आज रविवारी २५ मार्च रोजी धुलनिवंदनचे औचित्य साधात त्यांचा कल्याण राज्य प्रगती पक्ष भारतीय जनता पक्ष (BJP) मध्ये विलीन केला आणि त्यांची पत्नी अरुणा लक्ष्मी आणि इतर अनुयायांसह भाजपामध्ये औपचारिकपणे पुन्हा प्रवेश केला.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खाण व्यावसायिक जी जर्नादन रेड्डी यांच्या अवैध खाणी असल्याच्या आरोपावरून आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात सुषमा स्वराज यांना मोठ्या प्रमाणावर निवडणूकीसाठी फंड दिल्याच्या आरोपावरून जी जर्नादन रेड्डी यांना विधिमंडळ सदस्यत्वाचा आणि मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच जी जर्नादन रेड्डी आणि त्यांच्या बंधूना भाजपातून काढून टाकण्यात आले होते.

मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये जर्नादन रेड्डी यांनी औपचारिकपणे स्वतःची राजकीय संघटना तयार करून त्या मार्फत राजकिय क्षेत्रात अस्तित्व टीकविण्याचा प्रयत्न करत होते. तरीही प्रत्यक्षात खाणकामाशी संबंधित कायदेशीर मुद्द्यांचा त्यांच्या राजकीय कार्यावर परिणाम झाल्यापासून ते एका दशकाहून अधिक काळ भाजपाने लांब ठेवल्यानंतर भाजपामधील नेत्यांशी त्यांचे संबध राहिले. परंतु विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने विजय मिळविल्यापासून भाजपाच्या अधिपत्याखालील भागात अडचणी निर्माण करण्याचे काम सुरु केले.

जी जर्नादन रेड्डी यांनी दिग्गज नेते बी.एस. येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत पक्षात पुन्हा प्रवेश घेतल्यानंतर लगेचच म्हणाले की, येथील माझे मित्र आणि हितचिंतक पाहता, मी १३ वर्षांनंतर भाजपाच्या कार्यालयात येत आहे असे मला वाटत नाही. खरं तर, मला असं वाटतं की मी कालच या ऑफिसमधून बाहेर पडलो होतो आणि आजच परततोय.

आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या राजकीय प्रभावाचा प्रतिकार करण्यास उत्सुक असलेल्या भाजपा नेतृत्वाने गेल्या आठवडाभरात जी जर्नादन रेड्डी यांच्याशी सलगी करून त्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक बैठका घेतल्याचे कळते.

दरम्यान, जी जर्नादन रेड्डी, हे त्यांच्या नवीन कल्याण राज्य प्रगती या राजकीय संघटनेचे एकमेव आमदार आहेत. यावेळी बोलताना जर्नादन रेड्डी म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला आमंत्रित केले होते आणि बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी पक्षात सामील होण्याचे आमंत्रण दिले होते.

त्यांचा भाजपामध्ये प्रवेश करणे किंवा त्यांचा पक्ष भाजपामध्ये विलीन करणे हे पूर्णपणे “बिनशर्त” असल्याचे स्पष्ट करून जी जर्नादन रेड्डी म्हणाले, मी केवळ भाजपामध्ये आलो आहे ते मोठ्या संख्येने लोकांचे नरेंद्राचे स्वप्न साकार करण्यासाठी काम करण्यासाठी. मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी आल्याचे सांगितले.

पुढे बोलताना जी जर्नादन रेड्डी म्हणाले की, देवाने आणि भाजपाने मला तरुण वयात जे काही मागू शकत होतो ते दिले आहे. मी आयुष्यातले सगळे चढ-उतार पाहिले आहेत. आता मला कोणत्याही पदाची गरज नाही. मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेन आणि पक्ष मला जी काही जबाबदारी देईल ती सांभाळेल असे सांगितले.

जर्नादन रेड्डी यांचे जवळचे सहकारी बी. श्रीरामुलू, ज्यांना आता भाजपाने बल्लारी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे, रेड्डी यांनी पक्षात पुन्हा प्रवेशाच्या कार्यक्रमालाही यावेळी उपस्थित होते.

रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे, जर्नादन रेड्डी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश केल्याने पक्षाला विशेषतः बल्लारी आणि आसपासच्या भागात मदत होईल असे मानले जाते.

जर्नादन रेड्डी यांचे पक्षात स्वागत करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र म्हणाले की, त्यांच्या पुन:प्रवेशाने पक्षाची ताकद वाढली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी मंत्री टी. जॉन यांचे पुत्र थॉमस जॉन यांनीही सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला.

 

Check Also

एनआयएकडून रामेश्वरन कॅफे स्फोटप्रकरणातील आरोपींना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटामागील मुख्य आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *