Breaking News

जेएनयूवर पुन्हा एकदा डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेचा विजयी झेंडा

एकाबाजूला देशात लोकसभा निवडणूकांचे वारे वहात असताना आणि देशात उजव्या विचारांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर उजव्या विचाराच्या विद्यार्थ्यांनी जंगजंग पछाडूनही नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापाठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणूकीत पुन्हा एकदा डाव्या विचाराच्या जेएनयूएसयु विद्यार्थी संघटनेने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा स्थापित केले. विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या झालेल्या निवडणूकीचा निकाल रविवारी जाहिर करण्यात आला. (जेएनयूएसयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्यांनी क्लीन स्वीप केला.

चार वर्षांनंतर झालेल्या JNUSU निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सहसचिव ही चारही पदे डाव्यांनी जिंकली. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) चे धनंजय यांनी ABVP उमेदवार उमेश सी अजमीरा यांच्या विरुद्ध २,५९८ मते मिळवून JNUSU च्या अध्यक्षपदी विजय मिळवला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अभाविपचे उमेश सी अजमीरा यांना १,६७६ मते मिळाली. विशेष म्हणजे ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे धनंजय हे दलित समुदायातील आहे. या निमित्ताने जेएनयुच्या इतिहासात दलित असलेल्या धनंजय यांच्याकडे अध्यक्ष पदी निवड झाली आहे.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे अविजित घोष यांना २,४०९ मते मिळाली आणि त्यांनी ABVP च्या दीपिका शर्मा यांना १,४८२ मते मिळाली. त्यामुळे अविजित घोष हे उपाध्यक्षपदी विराजमान झाले.

बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन (BAPSA) च्या उमेदवार प्रियांशी आर्य २,८८७ मते, मिळाली त्यांना डाव्यांचा पाठिंबा होता, यांनी सरचिटणीस पदावर विजय मिळवला, त्यांनी ABVP च्या अर्जुन आनंद यांना १,९६१ मते मिळाली. यात ९२६ मतांच्या फरकाने पराभव केला.

ABVP ने त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिल्यावर निवडणूक समितीने स्वाती सिंग यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्यानंतर डाव्यांनी आर्या यांना पाठिंबा दिला.

डावे उमेदवार मोहम्मद साजिद यांनी २,५७४ मते मिळवली आणि ABVP च्या गोविंद डांगी यांना २,०६६ मते मिळवून पराभूत केले. त्यामुळे मोहम्मद साजिद यांचा संयुक्त सचिव पदावर विजय मिळाला.

रविवारी सकाळी मतमोजणी सुरू असताना, ट्रेंडनुसार चारही जागांवर अभाविपने आघाडी घेतली होती, त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसा डाव्यांनी अभाविपशी हातमिळवणी केली आणि शेवटी विजय मिळवला. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव आणि सरचिटणीस या चार सदस्यीय केंद्रीय पॅनेलसाठी शुक्रवारी २२ मार्च रोजी मतदान झाले.

नवोदित अध्यक्ष धनंजय म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी आणि समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व देणारे डावे पक्ष आहेत. हा विजय म्हणजे सरकारने केलेल्या विश्वासघाताला उत्तर आहे, अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना धनंजय म्हणाले, आमचा लढा हा उपेक्षित विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण आणि जातीय भेदभावाच्या विरोधात आहे आणि आमचा फोकस समाजातील प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व करणे आहे. आम्ही निधी आणि इतर कॅम्पस-संबंधित समस्यांसाठी लढू अशी घोषणाही यावेळी केली.

जेएनयूमधील विविध अभ्यास केंद्रांवर स्थापन करण्यात आलेल्या १७ बूथवर सकाळी ११ वाजता मतदान सुरू झाले आणि ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहिले. सकाळी ९ वाजता सुरू होणार होते. बुधवारी २०रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयूएसयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्यांनी क्लीन स्वीप केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *