Breaking News

कतारने ८ भारतीयांना का सुनावली फाशीची शिक्षा, वाचा काय आहे प्रकरण ? भारतीय नौदलाच्या ८ भारतीय अधिकाऱ्यांना कतारच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली

कतारमध्ये भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने भारतात शांतता पसरली आहे. या अधिकाऱ्यांवर इस्रायलला गुपितं पुरविल्याचा आरोप कतारने केला आहे. अल-जझीरा या वेबसाईटने दिलेल्या बातमीनूसार या अधिकाऱ्यांवर कतारच्या पाणबुडी संदर्भातील गुपिते इस्रायलला पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

मात्र दुसरीकडे अधिकाऱ्यांवर नेमके काय आरोप ठेवलेत याची माहीती द्यायला कतारने नकार दिला आहे. भारत सरकारने नौदलाच्या या माजी अधिकाऱ्यांना सर्व कायदेशीर मदत पुरविण्याबरोबरच सर्व पर्याय खुले ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र दुसरीकडे कतात सरकार या नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यास ठाम असून नौदल अधिकार्यांच्या परिवाराने भारतीय सरकारकडे त्यांना सोडवण्यासाठी मदत मागितली आहे.

भारतीय नौदलाच्या ज्या अधिकाऱ्यांना कतारच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे त्यांचे सर्व्हीस रेकॉर्ड एकदम चांगले असून त्यांना राष्ट्रसेवेसाठी राष्ट्रपती पदकांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पुरेनेंदू तिवारी, कमांडर सुगुनकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश यांना कतारच्या गुप्तचर एजन्सीने ३० ऑगस्ट २०२२ रोजी दोहा येथून अटक केली होती.

एका अधिकाऱ्याने तामिळनाडू स्थित प्रतिष्ठीत डीफेन्स सर्व्हीसेस स्टाफ कॉलेज वेलिंगटनमध्ये इंस्ट्रक्टर म्हणून सेवा बजावली आहे. तर एका अधिकाऱ्याने विमानवाहू नौका आयएनएस विराटवर फायटर कंट्रोलर आणि नेविगेटिंग ऑफीसर म्हणून काम केले आहे. कोर्ट ऑफ इन्स्टन्स ऑफ कतारने या प्रकरणात दोहात काम करणाऱ्या भारतीय नौदलाच्या आठ अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याचे गुरुवारी भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.

भारताने कतार या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे भारतीय नागरिक ग्लोबल टेक्नॉलॉजीज एण्ड कंसल्टन्सी सर्व्हीसेसमध्ये काम करत होते. दहरा रॉयल ही कंपनी डीफेन्स सर्व्हीस प्रोवायडर म्हणून काम करणाऱ्या ओमानी वायू सेनेच्या माजी अधिकाऱ्याची आहे. भारतीय नौदलाचे माजी अधिकाऱ्यांनी कतारच्या आधुनिक पानबुड्यांची गुप्त माहीती इस्रायलला पुरविल्याचा कतारने आरोप ठेवला असून या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे.

 



 

 

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *