Breaking News

सर्वात श्रीमंत असलेल्या तिरूपती देवस्थानची संपत्ती कोठे आणि किती माहित आहे का? ९६० जंगम मालमत्ता तर १४ टनाहून अधिक सोने, ठेवी वेगळ्या

तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. देश-विदेशातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळते. या मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देतात. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे.

तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी म्हणाले, देशात देवस्थानाच्या ९६० मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत ८५,७०५ कोटी रुपये आहे. १९७४ ते २०१४ सालादरम्यान वेगवेगळ्या सरकारच्या अंतर्गत मंदिर समितीने ११३ मालमत्ता निकाली काढल्या आहेत. मात्र, २०१४ नंतर एकाही मालमत्तेची विक्री केली नाही.

राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करुन मागील विश्वस्त मंडळाने दरवर्षी संपत्ती आणि मालमत्तेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे २०२१ साली पहिली तर, यंदा दुसरी श्वेतपत्रिका काढण्यात आली आहे. दोन्ही श्वेतपत्रिका तिरुपती देवस्थानच्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. भाविकांना पादर्शक कारभार आणि देवस्थानाच्या संपत्तीचे जतन करण्याचे वचन देतो, असे सुब्बा रेड्डी यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, तिरूपती बालाजी देवस्थानाची विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये १४ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी आहेत. तर, १४ टन सोन्याचा साठाही देवस्थानाकडे आहे. त्यामुळे तिरूपती बालाजी देवस्थान जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जात असून याबाबतचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *