Breaking News

भाजपमधील आणखी एका मंत्र्याचा खडसे करण्याच्या हालचाली

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मंत्र्याच्या दालन आणि बंगल्यावर छुपा पहारा

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या मंत्रिमंडळातील डोईजड होणाऱ्या मंत्र्यांना वैदर्भीय दणका देत पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी शिल्लक ठेवायचा नसल्याची रणनीती आखण्यात येत आहे. काही वर्षापूर्वी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनाही असाच दणका देत पक्ष आणि सत्तेबाहेर ठेवण्यात आले. अगदी त्याच पध्दतीने मंत्रालयातील चवथ्या मजल्यावरील आणखी एका भाजप मंत्र्याचाही खडसे करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून व्यवस्थितरित्या छुपा पहारा ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती नुकतीच पुढे आली आहे.

मंत्रालयातील चवथ्या मजल्यावर ग्रामविकास विभाग, उद्योग विभाग आणि परिवहन विभागाच्या मंत्र्यांची दालने आहेत. यातील भाजप मंत्र्याच्या अखत्यारीत असलेल्या एका विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब होत आहे. तसेच अशा व्यक्तींचा राबता वाढला आहे. त्यामुळे सदर मंत्र्यांच्या दालनात कोण-कोण येत?, कुणाच्या कोणासोबत बैठका होतात याची लाचलुचपत विभागाकडून सातत्याने माहीती घेण्यात येत आहे. यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे एक तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती एका उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

या मंत्र्याच्या दालनाबरोबरच त्यांच्या वरळी येथील बंगल्यावरही नजर ठेवण्यात येत असून या परिसरातही त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची गुप्तपणे माहीत गोळा करण्यात येत आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या दालनातही काही व्यक्तींकडून अशाच पध्दतीची कामे करण्यात येत असल्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यावेळीही अशाच पध्दतीने खडसे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्याकडे काम करत असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्याच पध्दतीनेही या मंत्र्यावर आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *