Breaking News

उत्तर प्रदेशात ओवेसी यांच्यावर गोळीबार गाडीला दोन गोळ्या लागल्या मात्र ओवेसी सुरक्षित

मराठी ई-बातम्या टीम

अल्पसंख्याक नेते तथा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल अर्थात एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असुदुद्दीन ओवेसी यांच्यावर आज दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. परंतु त्यांना कोणत्याही स्वरूपाची दुखापत झाली नसून ते सुरक्षित आहेत. मात्र त्यांच्या वाहनाचे टायर पंक्चर झाले. सदरची घटना उत्तर प्रदेशातील मेरठच्या किथौध येथून जात असताना घडली.

आज मेरठच्या किथौध भागातून दिल्लीला जात असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडल्या.

या हल्ल्यात ओवेसी यांच्या वाहनाला दोन गोळ्या लागल्या आहेत. मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही. सदरचा हल्ला हा उत्तर प्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे बोलण्यात येत आहे. उत्तर प्रदेश निवडणूकीत एआयएमआयएम पक्षाकडून अनेक ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आले आहेत.

दरम्यान याबाबत एका खाजगी वृत्त वाहीनीशी बोलताना ओवेसी म्हणाले की, मी किथौध, मेरठ येथील एका मतदान कार्यक्रमानंतर दिल्लीला निघालो होतो. छाजरसी टोल प्लाझाजवळ दोन लोकांनी माझ्या वाहनावर सुमारे तीन ते चार गोळ्या झाडल्या. ते एकूण ३-४ लोक होते. माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले, त्यानंतर मी तेथून दुसऱ्या वाहनाने निघाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात वापरलेली शस्त्र सापडली असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी. या घटनेमागे कुणाचा हात होता, याचा तपास करावा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकारने याची चौकशी करावी. एका खासदारावर उघडपणे गोळीबार होणं, हे कसं शक्य आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मागील अनेक महिन्यांपासून एआयएमआयएम आणि भाजपाच्या अदृष्य युतीबाबत नेहमी चर्चा घडवून येत होती. मात्र हैद्राबाद महापालिकेत भाजपाने एआयएमआयएमला जोरदार झटका देत पालिकेची सत्ता हस्तगत केली. त्यामुळे अशी काही अदृष्य युती नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *