Breaking News

‘मुकनायक’ पुरस्काराच्या निमित्ताने

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे मनोगत

‘मुकनायक’ ह्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या लेखणीच्या चळवळीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. हे पाक्षिक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतून सुरु केले. यानिमित्ताने ‘मुकनायक’ हा पुरस्कार सुरु करण्यात येत आहे. या प्रथम पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे.

पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या अनु.जातीच्या शिक्षित तरूणाने या पाक्षिकाचे संपादन केले. मुकनायकच्या व्यवस्थापक पदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नियुक्ती केली होती. या पाक्षिकासाठी छत्रपती शाहू महाराजांनी त्याकाळी २ हजार ५०० रूपयांची आर्थिक मदत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दिली होती.

या पाक्षिकाचा मुळ उद्देश शोषित, वंचित समाजाचा आवाज सरकारपर्यंत व जनतेपर्यंत पोहोचवणे व समाजाला जागृत करणे हा होता. डॉ.बाबासाहेबांनी या पाक्षिकाच्या माध्यमातून प्रचंड वैचारीक लेखण करून सामाजिक, आर्थिक, राजकिय क्षेत्रात अस्पृशांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली. याच उद्देशाने हा पुरस्कार सुरु करण्यात येत आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *