Breaking News

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द दहावीचे दोन पेपर वेळापत्रकानुसार होणार असल्याची शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी करत नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेतल्या जाणार असल्याचे सांगत दहावीच्या परीक्षेचे दोनच पेपर हे शिल्लक राहिले असल्याने ते नियोजित वेळात्रकानुसारच असून त्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सीबीएसई आणि इतर केंद्रीय मंडळाने आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकल्याचा निर्णय घेतल्यानंतर आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच शाळा- महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिली असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाजगी कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानेही बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली आणि आठवीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करून त्यांचा निकाल जाहीर केला जाईल असे त्यांनी जाहीर केले.
शिक्षकांना वर्क फॉर्म होमची मुभा
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीनुसार शिक्षकांना आजपासून वर्क फॉर्म होमची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे आजपासून घरातून काम करू शकतील.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *