Breaking News

मंत्री राम शिंदें पक्षश्रेष्ठींना म्हणाले विखे-पाटीलांना मंत्री करू नका सरकार स्थापन होण्यापूर्वीच भाजपातर्गंत वातावरण तापले

मुंबईः खंडूराज गायकवाड
भाजपला सत्ता स्थापन करायला एकीकडे अद्याप मुहूर्त मिळत नसताना दुसरीकडे मात्र पक्षांतर्गत बंडाळीमुळे सध्या भाजपातर्गंत राजकारण जोरदार तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यावर आपल्याशिवाय कोणाची पकड निर्माण होवू नये यासाठी भाजपाचे पराभूत मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे- पाटील यांनाच मंत्रिमंडळात घेवू नये अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करत त्यासाठी जोरदार लाँबिंग सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
राज्यात सत्ता स्थापनेवरुन जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. भाजपला अद्यापही शिवसेनेच्या अडथळ्यामुळे सरकार बनवायला अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे सर्व असताना भाजपमध्ये सर्व काही अलवेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकसभा निवडणुकीत मुलगा सुजय यास काँग्रेसकडून खासदारकीचे तिकिट मिळत नसल्याचे दिसताच आधी मुलाला आणि नंतर स्वतः विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपच्या तंबूत दखल झाले. चिरंजीवासाठी नगर जिल्ह्याची खासदारकी पदरात पाडून घेत स्वतःसाठी मंत्रीपदही घेतले. परंतु विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने खरा राजकीय धोका निर्माण झाला तो कॅबिनेट मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना.
अन घडलं ही अगदी तसेच,कारण लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना कर्जत-जामखेड या विधानसभा मतदार संघात कमी मतदान झाल्याने याचे उटे काढण्यासाठी कालच्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मदत केली नसल्याची भावना शिंदे समर्थकांची आहे.
सध्या “विखे जिंकले,भाजपा हरली” अशी चर्चां नगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.राम शिंदे (कर्जत जामखेड) बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) स्नेहलता कोल्हे(कोपरगाव) शिवाजीराव कर्डीले (राहुरी) वैभव पिचड (अकोले) येथे भाजपा उमेदवारांचा पराभव झाल्याने याचे खापरे विखे-पाटील पिता-पुत्रावर फोडले जात असून मंत्री राम शिंदेच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातील एक नाराज गट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वी भेटून नगर जिल्ह्यातील सर्व राजकीय परिस्थिती समजावून सांगितली. त्याचबरोबर नवीन मंत्रिमंडळात विखे पाटील यांचा समावेश करून घेवू नये अशी आग्रही भूमिका घेतली. विखे-पाटील यांच्याऐवजी धनगर समाजाचे आपण स्वतःच नेतृत्व करत असून आपले अर्थात राम शिंदे यांचे मंत्रिमंडळात पुनर्वसन करावे अशी मागणी या नाराज गटाने पक्षश्रेष्ठीकडे केल्याचे बोलले जाते.
परंतु सध्या फडणीस यांनी गोपीचंद पडवळ यांना धनगर समाजाचे नेते म्हणून पुढे आणले असल्याने शिंदे यांचे पुनर्वसन होणे शक्य नसल्याचे भाजपच्या एक वरिष्ठ नेत्याने सांगितले.
सध्या नगर जिल्ह्यात बबनराव पाचपुते (श्रीगोंदा) मोनिका राजाळे (शेवगाव) आणि राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) हे तीनच आमदार भाजपच्या तिकिटावर निवडूण आले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस राम शिंदेंवर नाराज
गेल्या आठवडयात दिल्लीवरून भाजपचे श्रीमती सरोज पांडे यांच्यासह वरिष्ठ पक्ष निरीक्षक महाराष्ट्रात आल्यावर मंत्री राम शिंदे यांनी विखे-पाटील यांना मंत्रिमंडळात घेवू नका, जर त्यांचे पुनर्वसन होत असेल तर माझे ही पुनर्वसन झाले पाहिजे, असा आग्रह धरला होता. याबाबत ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी शिंदे यांना वर्षा बंगल्यावर बोलावून चांगलेच झापल्याची चर्चा भाजपामध्ये सुरु आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *