Breaking News

पृथ्वीराज चव्हाणही भ्रमित, होय सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रातच चव्हाण यांच्या आरोपांवर अर्थमंत्री मुनगंटीवारांचा पलटवार

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा अन्य नेत्यांप्रमाणे विषय समजून न घेता, आपल्या सोयीची माहिती काढून पत्र परिषदा घेत सुटले आहेत. निवडणुकीच्या वर्षांत त्यांचा हा अट्टाहास असू शकतो. पण महाराष्ट्राची बदनामी निदान माजी मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने तरी करू नये असा उपरोधिक टोला लगवात आजही सर्वाधिक स्टार्ट अप हे महाराष्ट्रातच आहेत. पीएमओत काम केलेल्या मंत्र्यांनी तरी अहवालातील सोयीचे तेवढे अर्थ काढायचे नसतात असा पलटवार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपाला प्रतित्तुर देताना केला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्टार्टअप इंडियाबाबत केंद्राने तयार केलेल्या अहवालातील मुद्द्याच्या आधारे आरोप केल्यानंतर तातडीने भाजपच्यावतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खुलासेवार प्रसिध्दी पत्रक जाहीर केले.

ज्या अहवालाचा संदर्भ घेत पृथ्वीराज चव्हाण बोलत आहेत, त्याच अहवालात देशात एकूण १४,०३६ स्टार्टअप मान्यताप्राप्त आहेत. त्यापैकी सर्वाधिक २ हजार ७८७ स्टार्टअप हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राने फेब्रुवारी २०१८ मध्ये स्टार्ट अप धोरणाची घोषणा केली आणि डीआयपीपीने जे रँकिंग जाहीर केले. जाहीर केलेले रँकिंग हे मे २०१८ पर्यंत या धोरणाच्या केलेल्या इव्हॅल्यूशनवर आधारित आहेत. या धोरणाचे इव्हॅल्यूशन करण्यासाठी केवळ २ महिन्यांचा अवधी लाभल्याने, महाराष्ट्राला इमर्जिंग वर्गवारीत टाकले आहे. ही वर्गवारी धोरणाच्या असेसमेंटची आहे. सर्वाधिक स्टार्टअप कोणत्या राज्यात आहे, याची नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

सर्वाधिक स्टार्टअपच्या माध्यमातून महाराष्ट्र हेच स्टार्टअप कॅपिटल बनले आहे. त्यामुळे केवळ सोयीची आकडेवारी सांगून दिशाभूल करू नका, असे आवाहनही अर्थमंत्र्यांनी यावेळी केले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला, ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या मानांकनाचा. सिंगापूरच्या ली कॉन यू या जगविख्यात संस्थेने महाराष्ट्र हेच इज ऑफ डुईंग बिझनेसमधील अग्रणी राज्य असल्याचे आपल्या अहवालात सांगितले आहे. डीआयपीपीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास हे मानांकन दोन आधारावर करण्यात आले. एक प्रत्यक्ष कम्लायन्स आणि दुसरे परसेप्शन. डीआयपीपीने ज्या सुधारणा करण्यास सांगितल्या, त्यात महाराष्ट्राने ९७ टक्के बाबींची पूर्तता केली आहे. पण, आज देशातील सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रात येत असल्याने गुंतवणूकदारांच्या अपेक्षाही अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे परसेप्शन इंडेक्समध्ये महाराष्ट्राला ९३ टक्के गुण मिळाल्याचा खुलासाही त्यांनी केला.

औद्योगिक विकास दरात सुद्धा महाराष्ट्र हेच अग्रणी राज्य असून, आजही देशाच्या विकासदरापेक्षा महाराष्ट्र आघाडीवर आहे. संपूर्ण देशाचा औद्योगिक विकास दर ४.४ टक्के असताना राज्यात ६.५ टक्के इतका विकास दर आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीने तरी किमान महाराष्ट्राची बदनामी होईल, अशी चुकीची आकडेवारी देऊन दिशाभूल करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *