Breaking News

युनोतून परतलेले प्रविण परदेशी आता या विभागाचे अप्पर मुख्य सचिव ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जावून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रविण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. मात्र तेथूनही त्यांची बदली करण्यात आल्याने त्यांनी राज्याच्या सेवेत राहण्याऐवजी युनोत प्रतिनियुक्तीवर जाणे पसंत केले. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे थेट अर्जही केला. त्यानुसार एक वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर जाण्यास केंद्रानेही परवानगी दिली. आता ते राज्याच्या सेवेत पुन्हा परतले असून त्यांची नियुक्ती मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासह ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या राज्य सरकारने केल्या. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी करण्यात आले.

तत्पूर्वी सत्तांतरानंतर महाविकास आघाडी सरकारने प्रविण परदेशी यांना मंत्रालयातून मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती देण्यात आली. परंतु काही कालावधीनंतर त्यांच्या ठिकाणी नगरविकास विभागाचे सचिव डॉ.इक्बाल सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली. तर परदेशी यांच्याकडे नगरविकास विभागाचा पदभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर ते युनोत प्रतिनियुक्तीवर गेले.

तर आयटी विभागाचे संचालक असलेले रणजीतकुमार यांची मुख्य सचिव कार्यालयाच्या सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी व्ही.पी.फड यांची उस्मानाबाद जि.पच्या मुख्याधिकारी पदावरून मराठवाडा स्टॅट्युटरी डेव्हलपमेंट विभागाच्या सचिव पदी बदली करण्यात आली. तर डॉ.पंकज अक्षिया यांची भिवंडी-निझामपूर महानगरपालिका आयुक्त पदावरून जळगांव जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राहुल गुप्ता यांनी गडचिरोलीच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि अहेरी उपविभागाच्या प्रकल्प अधिकारी पदावरून उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मनुज जिंदाल यांची गडचिरोलीतील अटापली, गडचिरोली उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी यांची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.

मिताली सेठी यांची अमरावती धरणीच्या सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी पदावरून चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

One comment

  1. प्रवीण परदेशी हे उत्तम प्रशासक व सकारात्मक विचारांची भरपूर शिदोरी त्यांचेकडे आहे.महाराष्ट्र शासनाने त्यांचे योग्यतेचा उपयोग घेणे योग्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *