Breaking News

Tag Archives: mantralay

आमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाणून घेतल्या मागण्या

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात येण्यास राज्य सरकारने जनतेला मनाई केली. त्यामुळे एका शिक्षकाने आपल्या प्रश्नासाठी मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास प्रवेश न मिळाल्याने अखेर त्याने आकाशवाणी आमदार निवासाच्या ४ थ्या मजल्यावर सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु …

Read More »

मंत्रालयात ई-फाईल, ई-लीव्ह, एमआयएस प्रणाली सुरू होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे ई-ऑफिस सुरु करण्यासंदर्भात आदेश

मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय व्यवस्था गतिमान करतानाच जनतेलाही चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ई-ऑफिस प्रणाली आणखी सक्षम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. त्यानुसार मंत्रालयातील नस्ती व्यवस्थापन ई-फाईल, रजा व्यवस्थापन ई-लीव्ह, ज्ञान व्यवस्थापन केएमएस, माहिती व्यवस्थापन एमआयएस या प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मंत्रालयातील ई-ऑफिस प्रणालीबाबत सादरीकरण तसेच आढावा बैठक मुख्यमंत्री …

Read More »

या बँका देणार शासकिय अधिकाऱ्यांना वेतन खात्याबरोबर अपघात विम्याचे कवच राज्य सरकारकडे बँकांनी सादर केले प्रस्ताव

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रीयकृत बँकामधील आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही बँकामधील गंगाजळी कमी झाल्याचे चर्चा ऐकायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील चार बँकांनी आपल्या बँकातील आर्थिक व्यवहार वाढविण्याच्यादृष्टीने शासकिय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बँकांमध्ये पगाराची खाती उघडल्यास अपघात विम्याचा मोफऱत लाभ देण्याची घोषणा केली. तसेच त्यासंदर्भातचा एक …

Read More »

फडणवीस सरकारने मंजूर केलेले महसुल विभागातील कारकून बनले आता “महसूल सहाय्यक” राज्य सरकारकडून पदनाम बदलीसंदर्भात आदेश जारी

मुंबई : विशेष प्रतिनिधी सरकारमधील प्रशासनात नेहमीच महत्वाची भूमिका बजाविणारी कारकून जमात ही नेहमीच महत्वपूर्ण मानली जाते. तसेच या जमातीशिवाय दस्तुरखुद्द सरकार आणि जनतेचे पान हालत नाही. सरकारी भाषेत या कारकूनाला लिपिक हा शब्द वापरण्यात येतो. मात्र आता महसूल विभागात कार्यरत असणाऱ्या या जमातीला कारकून अर्थात लिपिक शब्द आवडेनासा झाला …

Read More »

आणि मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा करावा लागला मुक्काम कालच्या पावसामुळे सगळीकडेच पाणी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात ४७ वर्षातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस काल पडला. तसेच मंत्रालयातील प्रमुख तीन प्रवेशद्वारावर निसर्गाने अवकृपा दाखविल्याने अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेरच पडता आले नाही. त्यामुळ‌े अखेर या १५ टक्के उपस्थिती राहीलेल्या बहुतांष अधिकारी-कर्मचाऱ्यांना रात्री मंत्रालयातच मुक्काम ठोकावा लागला. काही महिन्यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तिन्ही मार्गावरच्या उपनगरीय रेल्वे …

Read More »

प्रशासनात डॉक्टर सहकारी असल्याचा असाही विभागाला फायदा कर्मचाऱ्यांच्या शरीरातील अॅण्टीबॉ़डी स्टेट करून सुरक्षिततेची घेतली काळजी

मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी पावले उचलण्यात येत आहेत. या विषाणूच्या संसर्गाची लागण स्वत:लाही होवू नये यादृष्टीने अनेकजण पुरेशी काळजी घेत आहेत. तरीही या विषाणूची लागण काही जणांना होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्रालयातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकंडवार यांनी विभागातील …

Read More »

मनिषा म्हैसकर यांच्याकडे पर्यावरण विभागाचा पदभार राज्य सरकारकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी नगरविकास विभागातून राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेल्या सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्याकडे आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्यासह अन्य दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या सह आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलेले आशुतोष सलिल यांची पर्यटन विभागाच्या …

Read More »

आता १५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यास परवानगी राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आर्थिक अडचणी आणि कोरोना विषाणूमुळे बदल्यांच्या प्रक्रियेवर घालण्यात आलेली बंदी आज काही अंशी राज्य सरकारने उठवित एकूण कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के बदलीस मान्यता देण्याचा निर्णय घेतला. तसेच यासंदर्भातील आदेशही आज सामान्य प्रशासनाने जारी केले. शासकिय सेवेत असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दर तीन वर्षाला बदली करण्याचा नियम आहे. त्यानुसार ज्यांचे …

Read More »

मंत्र्यांचा आदेश, प्रस्ताव तयार करा! पण नेमका कशाचा? अधिकारी बुचकळ्यात धारावी, मानखुर्द, गोवंडीचा पुनर्विकास, पण झोपड्यांचा कि इमारतींचा

मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील तीन महिने मुंबईतील कोरोना विषाणूचा वाढत्या प्रसारामुळे शहरातील झोपडपट्या आणि कमी आकारांच्या घरांचा प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले. यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांने गृहनिर्माण विभागाला तीन ओळीचे पत्र पाठवित धारावी, मानखुर्द, गोवंडीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यास सांगत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करायचे असल्याचे सांगितले. मात्र त्या तीन ओळीच्या पत्रता …

Read More »

सरकारी सेवानिवृत्तीला १ किंवा वयाच्या ६० वर्षापर्यंत मुदत वाढ शासन निर्णय लवकरच निघणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची परिस्थिती कधी अटोक्यात येईल याचा अंदाज अद्याप तरी राज्य सरकारला येत नाही. त्यामुळे आगामी काळात संभावित कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू नये यासाठी यावर्षी किंवा पुढील वर्षी सेवानिवृत्त होत असलेल्यांना १ वर्षाची मुदतवाढ किंवा वयाच्या ६० व्या सेवानिवृत्ती देण्याविषयी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून यासंदर्भात लवकरच …

Read More »