Breaking News

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत मंत्रालयातील महिला-पुरूष संघास कांस्यपदक संघात मंत्रालय आणि शासकिय कार्यालयीत कर्मचाऱ्यांचा समावेश

नवी दिल्लीतील कोहात एन्क्लेव्ह १६ ते १९ ऑक्टोबर या कालावधीमध्ये खो खो सामने खेळविण्यात आलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा अर्थात शासकिय कर्मचाऱ्यांची खो-खो स्पर्धा २०२३-२४ साठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयातील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या खो खो स्पर्धेत दोन्ही संघांनी कांस्य पदकाची कमाई केली. या यशाबद्दल संघातील खेळाडुंचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. आतापर्यंतच्या अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सांघिक खेळात महिला व पुरुष संघांनी पदके मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे.

केंद्र सरकारच्या केंद्रीय नागरी सेवा सांस्कृतिक व क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये यावर्षी प्रथमच खो-खो खेळाचा समावेश करण्यात आलेला होता. या स्पर्धेसाठी राज्य शासनाच्या वतीने सचिवालय जिमखाना, मुंबई या संस्थेकडुन राज्य शासनाच्या विविध शासकिय कार्यालय व विभागामध्ये सेवेत असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्यामधुन महाराष्ट्र शासनाच्या संघाची निवड करण्यात आली होती.

महिला संघाने ग्रुप स्टेजमधील आरएसबी चेन्नई, राजस्थान व पंजाब या संघाचा एकतर्फी पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महिला संघाने अत्यंत अटीतटीच्या सामन्यात स्थानिक दिल्ली सचिवालय संघाचा पराभव केला. उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या संघाचा बलाढ्य पुद्दुचेरी संघाकडुन पराभव झाला. परंतु त्यामुळे खचून न जाता कांस्य पदकांच्या लढतीत महिला संघाने केरळ संघाचा पराभव करताना जी विजीगुषी वृत्ती दाखविली त्याला तोड नव्हती. विशेषतः कविता घाणेकर हीने केलेल्या भक्कम बचावामुळे संघाचा विजय सुनिश्चित झाला.

पुरुष संघाने साखळी फेरीमधील गुजरात, आरएसबी अहमदाबाद व आरएसबी चेन्नई या संघांचा पराभव करुन उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत छतीसगड संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुर्देवाने उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या संघाचा आंध्र प्रदेश संघाकडुन पराभव झाला. तथापि पुरुष संघाने कांस्य पदकाच्या लढतीत पुद्दुचेरी संघाविरुद्ध विजय अक्षरशः खेचून आणला. संघाचा कर्णधार बाळासाहेब पोकार्डे याच्याबरोबरच संघातील प्रत्येक खेळाडूने विजयात योगदान दिले

महाराष्ट्र शासनाच्या पुरुष संघात बाळासाहेब पोकार्डे, सचिन पालकर, अमीन रमदान, स्वप्नील पोळ, मयूर घोडके, बाळु चेमटे, सुजित शेळवणे, अभिजित शेवते, प्रभाकर देवकते, श्रीनिवास मेतरी, पंकज वाकळे, आणि सुहास परब यांचा तर महिला संघात सारिका काळे, सुप्रिया गाढवे, कविता घाणेकर, सारिका जगताप, सोनाली शिंदे, मंजुषा अहिरराव, मनिषा मानकर, अदिती मन्वर, हिमाली पवार, कलावती गिरे, साधना शेंडगे आणि सोनाली केत या खेळाडुंचा समावेश होता.

सचिवालय जिमखान्याचे संचालक व खो-खो विभागाचे सचिव प्रताप माडकर यांनी पुरुष संघाचे आणि प्रतिभा गोरडे यांनी महिला संघाचे व्यवस्थापक म्हणून तर अनंता साळवे यांनी प्रशिक्षक म्हणुन जबाबदारी पार पाडली. अखिल भारतीय नागरी सेवा खो खो स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल सर्व खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *